(रत्नागिरी / प्रतिनिधी)
श्री सत्यसाई जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने श्री सत्यसाई सेवा समिती, रत्नागिरी विविध सामाजिक व आध्यात्मिक उपक्रम राबवत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जागतिक महिला दिनानिमित्त रत्नागिरीतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव सोहळा उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम श्री गजानन महाराज मंदिर व श्री सत्यसाई सेवा समिती, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमात मान्यवर महिलांचा शाल, श्रीफळ, मोमेंटो तसेच स्वामींच्या पादुकांचे प्रतीक देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला श्री गजानन महाराज मंदिर, पॉवर हाऊसचे अध्यक्ष म. वा. देसाई तसेच श्री सत्यसाई सेवा समिती, रत्नागिरीचे कन्व्हेनर भूषण अनंत बेलवलकर उपस्थित होते.
या वेळी रत्नागिरीच्या नगराध्यक्षा सौ. शिल्पा सुर्वे यांचा सत्कार सौ. स्वाती भूषण बेलवलकर यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच मान्यवर समूहाच्या संचालिका सौ. दया भिडे यांचा श्रीमती नलिनी बोंद्रे यांच्या हस्ते आणि सौ. मुग्धा भट-सामंत यांचा सत्कार सौ. प्रज्ञा गोखले यांच्या हस्ते करण्यात आला.

