( जाकादेवी / वार्ताहर )
रत्नागिरी तालुक्यातील वरची निवेंडी शांतीनगर बौद्धवाडी येथील बुद्ध, फुले शाहू, आंबेडकरी विचारधारेचे कार्यकर्ते, चिरे खाणी, आंबे व्यावसायिक प्रकाश कदम यांचे वयाच्या ६९ व्या वर्षी दि. २३ ऑक्टोंबर रोजी पहाटे हदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले आहे.
कालकथित प्रकाश कदम अतिशय प्रेमळ, कष्टाळू आणि परोपकारी व्यक्तिमत्त्व होते, छोट्या मोठ्यांना सन्मान देत अनेकांना प्रेरणा देणारे असे त्यांचे बोलणे असे. आयुष्यात कष्ट आणि प्रामाणिकपणा यांच्या जोरावर त्यांनी खूप माणसं जोडली. नातेसंबंध अविरतपणे जपले. आपल्या मुलांना त्यांनी व्यवसायात स्वावलंबी बनविले. त्यांच्या पश्चात भाऊ, पत्नी, मुलगे, सून असा परिवार आहे.त्यांचा पुण्यानुमोदन व शोकसभा कार्यक्रम रविवार २ नोव्हेंबर रोजी वरची निवेंडी शांतीनगर बौद्धवाडी येथे होणार आहे. त्यांच्या अंत्ययात्रेत शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक, विविध व्यावसाय क्षेत्रातील अनेक मान्यवर, नातेवाईक, मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.

