(देवरुख)
रत्नागिरी तायक्वांडो स्पोर्ट्स असोसिएशनच्या मान्यतेने आणि रत्नागिरी संघ, रत्नागिरी यांच्या सहकार्याने आयोजित 19 वी क्युरोगी व 13 वी पुमसे रत्नागिरी जिल्हा खुली चॅलेंज तायक्वांडो स्पर्धा 2025-26 नुकतीच छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम बॅडमिंटन हॉल, रत्नागिरी येथे उत्साहात पार पडली.
ही स्पर्धा जिल्हा संघटना अध्यक्ष व राज्य संघटना सदस्य व्यंकटेश्वरराव कर्रा, जिल्हा उपाध्यक्ष विश्वदास लोखंडे, जिल्हा सचिव लक्ष्मण कर्रा, जिल्हा कोषाध्यक्ष शशांक घडशी, आयोजक राम कर्रा व पंचप्रमुख भरत कर्रा यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडली. स्पर्धेत संगमेश्वर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातील सुमारे 600 खेळाडूंनी सहभाग नोंदवला.
संगमेश्वर तालुका तायक्वांडो अकॅडमी अंतर्गत नगरपंचायत देवरुख तायक्वांडो क्लबच्या खेळाडूंनी तालुक्याचे प्रतिनिधित्व करत नेत्रदीपक कामगिरी केली. संगमेश्वरच्या खेळाडूंनी एकूण 25 सुवर्ण, 8 रौप्य आणि 13 कांस्य पदके पटकावत जिल्हा स्पर्धेत आपला ठसा उमटवला.
पुमसे प्रकारात संगमेश्वर तालुक्याने द्वितीय क्रमांकाचा चषक, तर फ्री-स्टाईल पुमसेमध्ये तृतीय क्रमांकाचा चषक पटकावला.
सब-ज्युनिअर गटात रीतीशा कांगणे हिने फाईटमध्ये सुवर्णपदक जिंकत बेस्ट फाईटर ट्रॉफी मिळवली, तर कॅडेट गटात साहिल जागुष्टे याने सुवर्णपदकासह बेस्ट फाईटर ट्रॉफी पटकावून तालुक्याचा गौरव वाढवला.
क्युरोगी प्रकारातील पदक विजेते
स्पेशल मुली : जीविता देशपांडे – कांस्य
स्पेशल मुले: निकुंज घडशी – रौप्य
अनुराग यादव – कांस्य
सब-ज्युनिअर मुली
रीतीशा कांगणे – सुवर्ण
सई संसारे – रौप्य
अवनी भिंगार्डे – रौप्य
सब-ज्युनिअर मुले
शौनक राजवाडे – कांस्य
गंधार रेवडेकर – कांस्य
कॅडेट मुली
ईश्वरी कांगणे – सुवर्ण
कॅडेट मुले
साहिल जागुष्टे – सुवर्ण
मंथन चव्हाण – रौप्य
अजिंक्य शिंदे – कांस्य
ज्युनिअर मुले
आदित्य चिपळूणकर – कांस्य
सिनियर मुले
ओम घाग – सुवर्ण
सुमीत पवार – कांस्य
गंधर्व शेट्ये – कांस्य
दक्षसिंग राठोड – कांस्य
पुमसे प्रकारातील ठळक कामगिरी
सब-ज्युनिअर मुली
पूर्वा वनकर – 3 सुवर्ण, 2 रौप्य, 1 कांस्य
नक्षत्रा शिंदे – 2 सुवर्ण
रीतीशा कांगणे – 1 सुवर्ण
सब-ज्युनिअर मुले
शौर्य माळी – 5 सुवर्ण, 1 रौप्य
ईशान भागवत – 2 सुवर्ण
ऋतिक कांगणे – 1 सुवर्ण
वेदांत मसुरकर – 1 सुवर्ण
कॅडेट मुले
साहिल जागुष्टे – 1 सुवर्ण
सोमांश सावंत – 1 सुवर्ण, 1 कांस्य
ज्युनिअर मुले
साहिल जागुष्टे – 1 सुवर्ण
सोमांश सावंत – 1 कांस्य
सिनियर मुले
सुमीत पवार – 2 सुवर्ण, 1 रौप्य
सिनियर मुली
मयुरी राऊत – 1 सुवर्ण
या सर्व यशस्वी खेळाडूंचा नगरपंचायत देवरुख तायक्वांडो क्लब, देवरुख येथे आयोजित सत्कार समारंभात गौरव करण्यात आला. या कार्यक्रमास देवरुख शहराच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा मृणाल शेट्ये, प्रमुख प्रशिक्षक शशांक घडशी, क्लब उपाध्यक्ष संदेश जागुष्टे, प्रशिक्षक स्वप्नील दांडेकर, सुमीत पवार यांच्यासह पालक व क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

