(रत्नागिरी)
राज्यातील 12 जिल्हा परिषदां आणि त्याअंतर्गत असलेल्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी शनिवारी, 7 फेब्रुवारी रोजी मतदान पार पडलं. त्यानंतर तब्बल 7,438 उमेदवारांचं राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंद झालं आहे. आज (सोमवार, 9 फेब्रुवारी) रोजी मतमोजणी होणार असून, जिल्हा परिषदांच्या माध्यमातून ओळखल्या जाणाऱ्या ‘मिनी मंत्रालयावर’ कोणाचा झेंडा फडकणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
या निवडणुकांमध्ये ग्रामीण भागात अत्यंत चुरशीच्या आणि लक्षवेधी लढती पाहायला मिळाल्या. राज्यातील 12 जिल्ह्यांमध्ये सरासरी 60 ते 62 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. काही ठिकाणी मशीन बंद पडणे राजकीय कार्यकर्त्यांमधील बाचाबाची आणि स्थानिक प्रश्नांवरून मतदान बहिष्काराच्या घटना घडल्या असल्या, तरी एकूणच मतदान प्रक्रिया उत्साहात आणि शांततेत पार पडल्याचं प्रशासनानं सांगितलं आहे.
या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या 731 जागा आणि पंचायत समितीच्या 1,462 जागांसाठी मतदान झालं. मतमोजणीनंतर दुपारपर्यंत स्पष्ट चित्र समोर येण्याची शक्यता असून, ग्रामीण महाराष्ट्राचा कौल नेमका कोणाच्या बाजूने आहे, हे निकालातून समजणार आहे. अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे राज्यावर शोककळा पसरली. त्याचं सावट जिल्हा परिषद आणि पंचयात समितीच्या निवडणुकीवर दिसून आलं होतं. या पार्श्वभूमीवर उद्याच्या निकालाकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे
याआधी राज्यात नगर परिषद, नगर पंचायती आणि महापालिकांच्या निवडणुका पार पडल्या होत्या. त्या निवडणुकांमध्ये महायुतीने बाजी मारली होती. मात्र, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका या पूर्णपणे ग्रामीण प्रश्नांवर आधारित असल्यामुळे, या निकालांकडे राजकीय दृष्टिकोनातून विशेष लक्ष दिलं जात आहे. शेती, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि स्थानिक विकासकामे हे मुद्दे या निवडणुकांमध्ये निर्णायक ठरल्याचं चित्र आहे.
गावपातळीवर आरोप–प्रत्यारोप झाले असले, तरी ग्रामीण मतदारांनी स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देत मतदान केल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणनिहाय वेगवेगळे प्रश्न, भूमिका आणि अपेक्षा असल्यामुळे ग्रामीण भागातील जनतेचा कल कोणाकडे झुकतो, हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.
या 12 जिल्ह्यांत निवडणूक पार पडली
राज्यातील 12 जिल्हा परिषदां आणि त्याअंतर्गत असलेल्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी शनिवारी, 7 फेब्रुवारी रोजी मतदान पार पडलं. त्यानंतर तब्बल 7,438 उमेदवारांचं राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंद झालं आहे. आता सोमवार, 9 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार असून, जिल्हा परिषदांच्या माध्यमातून ओळखल्या जाणाऱ्या ‘मिनी मंत्रालयावर’ कोणाचा झेंडा फडकणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
या निवडणुकांमध्ये ग्रामीण भागात अत्यंत चुरशीच्या आणि लक्षवेधी लढती पाहायला मिळाल्या. राज्यातील 12 जिल्ह्यांमध्ये सरासरी 50 ते 65 टक्के मतदान झाले आहे. काही ठिकाणी राजकीय कार्यकर्त्यांमधील बाचाबाची आणि स्थानिक प्रश्नांवरून मतदान वाद अशा घडल्या असल्या, तरी एकूणच मतदान प्रक्रिया उत्साहात आणि शांततेत पार पडल्याचं प्रशासनानं सांगितलं आहे.
या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या 731 जागा आणि पंचायत समितीच्या 1,462 जागांसाठी मतदान झालं. मतमोजणीनंतर दुपारपर्यंत स्पष्ट चित्र समोर येण्याची शक्यता असून, ग्रामीण महाराष्ट्राचा कौल नेमका कोणाच्या बाजूने आहे, हे निकालातून समजणार आहे.
याआधी राज्यात नगर परिषद, नगर पंचायती आणि महापालिकांच्या निवडणुका पार पडल्या होत्या. त्या निवडणुकांमध्ये महायुतीने बाजी मारली होती. मात्र, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका या पूर्णपणे ग्रामीण प्रश्नांवर आधारित असल्यामुळे, या निकालांकडे राजकीय दृष्टिकोनातून विशेष लक्ष दिलं जात आहे. शेती, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि स्थानिक विकासकामे हे मुद्दे या निवडणुकांमध्ये निर्णायक ठरल्याचं चित्र आहे.
गावपातळीवर आरोप–प्रत्यारोप झाले असले, तरी ग्रामीण मतदारांनी स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देत मतदान केल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणनिहाय वेगवेगळे प्रश्न, भूमिका आणि अपेक्षा असल्यामुळे ग्रामीण भागातील जनतेचा कल कोणाकडे झुकतो, हे आजच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.
या 12 जिल्ह्यांत निवडणूक पार पडली
पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर; छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर; तर कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषदांसाठी ही निवडणूक घेण्यात आली.
या निवडणुकांच्या निकालातून ग्रामीण महाराष्ट्राचा राजकीय मूड स्पष्ट होणार असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणावर त्याचा मोठा प्रभाव पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

