प्रत्येकालाच आपल्या घरासमोर स्वतःची एक कार उभी असावी, असे वाटत असते. मात्र आपली कार नेमकी कोणती असावी, याबाबत अनेकांचा गोंधळ असतो. त्यातच आपल्या अवतीभवती कारच्या जाहिरातींचा अक्षरशः भडीमार सुरू असतो. सर्वच कंपन्या आपल्या कारची वैशिष्ट्ये व ती इतर कारपेक्षा कशी चांगली, याबाबत दावा करताना दिसत असतात. मात्र देशातील प्रमुख वाहन निर्माती कंपनी टाटा मोटर्सच्या गाड्यांवर ग्राहकांचा अधिक विश्वास असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे. टाटाच्या गाड्यांना बाजारात मोठी पसंती मिळत असून गाड्यांची मागणी नियमित वाढतच चालली आहे.
दरम्यान, टाटा कंपनीची “टाटा पंच” या कारला सर्वसमावेशक कार म्हणून ग्राहकांनी मान्यता दिली आहे. टाटा पंच अनेकांच्या स्वप्नातील कारचे प्रत्यक्ष रूप आहे. कारण ही कार अत्यावश्यक वैशिष्ट्यांसह अगदी कमी किमतीत खरेदी करता येते. विशेष म्हणजे कमी किमतीतही या कारमध्ये टॉप फिचर्स देण्यात आले आहेत. टाटा पंच ही देशातील एकमेव सर्वात सुरक्षित कॉम्पॅक्ट एसयुव्ही आहे.
टाटा पंचला लाँच करण्यापूर्वीच प्रख्यात “जीएनसीएपी”कडून 5 स्टार रेटिंग मिळाले होते. तर सन 2024 मध्ये टाटा पंचने देशात सर्व श्रेणीमध्ये सर्वात जास्त विकली गेलेली कार म्हणून अव्वल स्थान पटकावले आहे. सन 2024 मध्ये टाटा मोटर्स पंचच्या २,०२,०३० युनिट्स विकून प्रथम क्रमांकावर असून मारुती सुझुकीची वॅगनआर १,९०,८५५ युनिट्स विकून दुसऱ्या क्रमांकावर आहे.
टाटा मोटर्सनं त्यांच्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या मायक्रो एसयूव्ही टाटा पंचची अद्ययावत मॉडेलही लॉन्च केले आहे. यामध्ये कंपनीने अनेक नवीन फीचर्स दिले आहेत. हाय स्टान्स, हाय ग्राऊंड क्लीअरन्स आणि लक्षवेधक ड्रायव्हिंग पोझीशनसह पंच आकर्षक आणि स्टायलिश एसयूव्ही आहे, जी ऍडव्हेंचर ड्रायव्हिंगचा अनुभव देते. ही कार भारतातील राज्यातील सर्व भागात सहजपणे नेव्हिगेट करते. याच कारणामुळे ही कार शिखरामधून नेव्हिगेट करणारी पहिली फ्रण्ट-व्हील ड्राइव्ह एसयूव्ही ठरली आहे. तर तीव्र ग्रेडिएण्ट्समधून मार्ग काढत या कारने जगासमोर आपली एसयूव्ही क्षमताही दाखवून दिली आहे. टाटा पंचची दमदार क्षमता, सुरक्षा वैशिष्ट्यांचे काटेकोर पालन आणि अनेक पॉवरट्रेन पर्यायांसह इतर खास वैशिष्ट्ये हेच या कारच्या यशाचे गमक आहे. तर काही ठळक वैशिष्ट्यांमध्ये उच्च ग्राउंड क्लीयरन्स आणि कमांडिंग ड्रायव्हिंग पोझिशन यांचा समावेश आहे.
टाटा मोटर्सनं नवीन टाटा पंचमध्ये अनेक अत्याधुनिक फिचर दिले आहेत. या कारच्या Adventure Persona या मॉडेलमध्ये आता कंपनीने सनरुफ दिलेले आहे. हे सनरुफ इलेक्ट्रिक असेल. तर नवीन टाटा पंचमध्ये आता सेंटर कन्सोलमध्ये USB टाइप-सी चार्जिंग पोर्ट, वायरलेस Apple CarPlay आणि Android Auto सह नवीन 10.25-इंच टचस्क्रीन, इन्फोटेनमेंट सिस्टम असून या इन्फोटेन्मेंट सिस्टिमला वायरलेस अँड्रॉईड आणि अॅपल कार प्लेचा सपोर्ट आहे. यासह कारच्या सर्व व्हेरियंट्समध्ये वायरलेस चार्जर, ग्राँड कंसोलसह आर्मरेस्ट, रियर एसी व्हेंट्स, टाइप सी फास्ट USB चार्जर मिळणार आहे. या सर्व फिचरनंतर नवीन टाटा पंच पूर्वीपेक्षा अधिक आधुनिक आणि आरामदायक बनली आहे.
नवीन टाटा पंच 10 प्रकारांमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. Pure, Pure (ओ), Adventure, Adventure Rhythm, Adventure S, Adventure+S, ॲकम्प्लिश्ड+, ॲक्प्लिश्ड+एस, क्रिएटिव्ह+ आणि क्रिएटिव्ह+एस असे यात प्रकार दिले आहेत. कारच्या रंग पर्यायांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
टाटा पंचच्या कॅमो एडिशनमध्ये तुम्हाला 1.2 लीटर रेवोट्रॉन पेट्रोल इंजिन मिळेल. या इंजिनची क्षमता 1199cc, 3 सिलिंडर आहे. हे इंजिन पेट्रोलवर 87.8PS ची कमाल पॉवर आणि 115nm कमाल टॉर्क जनरेट करते. तर कारचे CNG इंजिन 73.5PS ची कमाल पॉवर देते आणि 103nm चा पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल/5-स्पीड एएमटीवर आधारित आहे.
टाटा पंच कॅमो एडिशनची लांबी 3827mm, रुंदी 1742mm आणि उंची 1615mm आहे. कारचा व्हील बेस 2445mm आहे, तर ग्राउंड क्लीयरन्स 187mm आहे. 5-स्पीड मॅन्युअल/5-स्पीड AMT प्रकारात 366 लीटर, 5-स्पीड मॅन्युअल CNG प्रकारात 319 लीटर आणि 5-स्पीड मॅन्युअल CNG प्रकारात 210 लीटर बूट स्पेस आहे. तसेच या कारची पेट्रोल क्षमता 37 लीटर आहे.
टाटा मोटर्स च्या कोकणातील एस.पी. ऑटोहबच्या शोरूममध्ये सध्या हजर स्टॉक मधील काही निवडक मॉडेल्सवर फ्री इन्शुरन्स आणि तब्बल 5 वर्ष 1 लाख 25 हजार किमी वॉरंटीची ऑफर उपलब्ध केली आहे. जिल्ह्यातील अनेकांनी टाटा वाहन खरेदी करत या ऑफरचा लाभ घेतला आहे. तसेच एस.पी. ऑटोहब मध्ये आपल्या जुन्या कारचे सर्वोत्तम इ-व्हॅल्युएशनही करता येणार आहे. तर 8.75 टक्के इतक्या कमी दराने 100 टक्के कर्ज सुविधाही फायनान्स कंपनीकडून उपलब्ध होणार आहे. अधिक माहितीसाठी टाटा मोटर्सच्या एस.पी. ऑटोहब रत्नागिरी, चिपळूण, कणकवली अथवा ओरोस येथील आपल्या नजीकच्या शोरूम ला भेट द्या किंवा 7377959595 या मोबाईल नंबरवर संपर्क करा, असे आवाहन अरुण देशपांडे यांनी केले आहे.