(जाकादेवी / संतोष पवार)
रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा देऊड गावातीलवाडी या शाळेतील अभ्यासू विद्यार्थीनी कु.ईशा संदेश घाणेकर हिची जिल्हा निवड चाचणीत इस्रो श्रीहरी कोटा आंध्र प्रदेश अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे.
ईशा संदेश घाणेकर ही अभ्यासात हुशार विद्यार्थी असून ती सातवी इयत्तेत शिकत आहे. तिला कबड्डी, थाळीफेक तसेच नृत्याची आवड आहे. कु.ईशाला शाळेतील शिक्षिका सौ.सायली चव्हाण यांचे बहुमोल मार्गदर्शन तसेच शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक ,ईशाचे आई -वडील यांची तिला प्रेरणा मिळाली. या निवडीबद्दल शाळेचे मुख्याध्यापक शैलेंद्र चव्हाण, मार्गदर्शक शिक्षिका सौ.सायली चव्हाण व सर्व शिक्षक, ग्रामस्थ, शिक्षक पालक संघ, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.
(फोटो– ईशा घाणेकर हिचा सन्मान करताना मुख्याध्यापक शैलेंद्र चव्हाण, व शिक्षक वर्ग)

