(रत्नागिरी / प्रतिनिधी)
आयुष्य नुकतेच उलगडू लागलेल्या वयातच नियतीने कठोर परीक्षा घेतली आहे. लांजा तालुक्यातील आंजणारी येथील सौ. स्नेहल प्रतीक जोशी (बेहेरे) (वय २१) ही तरुणी मंगळवारी (ता. १३ जानेवारी २०२६) सकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास हातखंबा परिसरात झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झाल्या आहेत. या अपघातात त्यांच्या डोक्याला जबर मार बसला असून सध्या त्यांच्यावर कोल्हापूर येथील WIINS हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे पुढील उपचार अत्यंत खर्चिक आणि दीर्घकालीन ठरण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. मात्र मर्यादित आर्थिक परिस्थिती असलेल्या कुटुंबासमोर आता उपचाराचा मोठा डोंगर उभा राहिला आहे. एका बाजूला मुलीच्या जीवासाठी सुरू असलेली झुंज आणि दुसऱ्या बाजूला उपचारखर्चाची चिंता या दुहेरी संकटात कुटुंब अक्षरशः खचून गेले आहे.
स्नेहल यांचे आयुष्य वाचवण्यासाठी समाजाच्या माणुसकीची आज कसोटी लागली आहे. प्रत्येकाचे छोटेसे सहकार्यही या तरुणीच्या श्वासासाठी, तिच्या भविष्याच्या आशेसाठी निर्णायक ठरू शकते. त्यामुळे स्नेहल यांच्या उपचारासाठी सर्व संवेदनशील नागरिकांनी पुढे येऊन मदतीचा हात द्यावा, असे कळकळीचे आवाहन कुटुंबीयांनी केले आहे.

मदतीसाठी संपर्क व पेमेंट तपशील :
गितेश गोविंद बेहेरे : ९५९४१७७६९४
ऋतिक दत्ताराम बेहेरे (भाऊ) : ८९७५९५७२१५
(Google Pay द्वारे आर्थिक मदत स्वीकारली जाईल)
एका तरुणीचे स्वप्न, तिचे आयुष्य आणि एका कुटुंबाचा आधार वाचवण्यासाठी समाजाने एकत्र येण्याची ही वेळ आहे. आज आपण दिलेली एक छोटीशी मदतही उद्या एखाद्याला नवे जीवन देऊ शकते, अशी नम्र आणि कळकळीची विनंती कुटुंबीयांकडून करण्यात आली आहे.

