(कळझोंडी / किशोर पवार )
रत्नागिरी नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. शिल्पा सुर्वे यांचे रत्नागिरी थिबा राजा कालीन बुद्ध विहार विकास चॅरिटेबल ट्रस्टचे वतीने बुके देऊन अभिनंदन करण्यात आले.
यावेळी अध्यक्ष प्रकाश रामचंद्र पवार, उपाध्यक्ष मारुती कांबळे, भगवान जाधव, सचिव विजय मोहिते, सहसचिव सुहास कांबळे, शशिकांत कांबळे, कोषाध्यक्ष प्रितम आयरे, सल्लागार मंगेश सावंत, संचालक सुनील कांबळे, दिपक जाधव, विलास कांबळे, किशोर पवार, जयवंत कदम, विजय आयरे आदी मान्यवर उपस्थित होते.नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांना भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

