(देवळे / प्रकाश चाळके)
आंगवली येथील श्री देव मार्लेश्वर मंदिरात दरवर्षी विविध स्थानिक व बाहेरील मंडळांकडून भक्तीभावाने सेवा उपक्रम राबवले जातात. कोणी फटाक्यांची आतषबाजी, कोणी रांगोळी, तर कोणी शंखनाद अशा माध्यमातून देवसेवा करत असते. याच परंपरेत आंगवली करकोटवाडीतील युवक गेल्या तब्बल २३ वर्षांपासून भाविक यात्रेकरूंना महाप्रसादाचे वाटप करत असून ही सेवा अखंडितपणे सुरू आहे.
“मार्लेश्वर चरणी आपली सेवा घडावी” या एकमेव उद्देशाने करकोटवाडीतील युवक दरवर्षी महाप्रसादाचे आयोजन करतात. कोणताही गाजावाजा किंवा प्रसिद्धीचा हेतू न ठेवता ही सेवा केली जात असून, पुढील काळातही ही परंपरा कायम ठेवण्याचा निर्धार युवकांनी व्यक्त केला आहे.
या सेवेत संतोष अणेराव, विनय अणेराव, राजेंद्र अणेराव, प्रकाश मांडवकर, सुरेश मांडवकर, अरुण मांडवकर, मनोहर शिंदे, अजित पवार, गौरव पवार, साहिल अणेराव, अभिषेक अणेराव, साहिल मांडवकर, प्रणील अणेराव, स्वप्निल शिंदे, आर्य अणेराव, बापू चव्हाण, संतोष गुडेकर, अक्षय शिंदे, सम्राट अणेराव, सिद्धेश अणेराव हे युवक उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत.
यावर्षी महाप्रसाद वाटपाबाबत काही ठिकाणी वाद निर्माण झाला होता. मात्र देवरुख पोलीस यंत्रणेने वेळीच हस्तक्षेप करून योग्य निर्णय घेत अन्नदानाच्या कार्याला सहकार्य केले. पोलिसांच्या सकारात्मक भूमिकेमुळे महाप्रसादाचे वाटप सुरळीत पार पडले.
गेली २३ वर्षे सुरू असलेली ही अविरत सेवा भविष्यातही अखंडपणे सुरू राहील, असे संतोष अणेराव व करकोटवाडीतील सर्व युवकांनी स्पष्ट केले असून देवरुख पोलीस यंत्रणेच्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले आहेत.

