(पाली / वार्ताहर)
यंदाच्या शैक्षणिक वर्षाच्या रत्नागिरी जिल्हास्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धा नुकत्याच चिपळूण तालुक्यातील डेरवण येथे संपन्न झाल्या आहेत. या स्पर्धेसाठी जि.प.पूर्ण प्राथमिक आदर्श विद्यामंदिर पाली क्र.१ शाळेची अष्टपैलू खेळाडू अवंतिका यल्लाप्पा हट्टीहोली हिने मोठा गट मुली थाळीफेक स्पर्धेमध्ये जिल्ह्य़ात द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.
या अगोदरही गतवर्षी थाळीफेक स्पर्धेमध्ये ती लहान गटातून जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांकाने विजयी झालेली होती. या सर्व खेळाडूंना मार्गदर्शक शिक्षक मारुती घोरपडे, मुख्याध्यापक जनार्दन मोहिते, उपशिक्षक ममता सावंत, श्रद्धा रसाळ, नेहा जाधव, श्रुती वारंग या सर्वांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या यशाबद्दल शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उमेश शिंदे, विद्यार्थी सुरक्षा समितीचे अॅड.सागर पाखरे यांनी तिचे अभिनंदन केले आहे.
फोटो– पाली शाळा क्र.१ च्या अवंतिका हट्टीहोली हिला थाळीफेक मध्ये जिल्ह्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल गौरवताना मान्यवर सोबत शाळेच्या पदवीधर उपशिक्षक श्रुती वारंग.

