(नवी दिल्ली )
मनोरंजन विश्वातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. इंडियन आयडॉल सीझन 3 चे विजेते आणि पाताल लोक 2 फेम गायक-अभिनेता प्रशांत तमांग यांचे रविवारी, 11 जानेवारी 2026 रोजी निधन झाले. नवी दिल्लीतील त्यांच्या राहत्या घरी त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असले तरी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. निधनावेळी त्यांचे वय 43 वर्षे होते.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत तमांग यांना यापूर्वी कोणतीही गंभीर आरोग्य समस्या नव्हती. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना दिल्लीतील द्वारका येथील रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. तो नुकताच अरुणाचल प्रदेशमध्ये एका कार्यक्रमासाठी गेला होता आणि दिल्लीतील राहत्या घरी परतल्यानंतर ही धक्कादायक घटना घडली.
प्रशांत तमांग नुकतेच अरुणाचल प्रदेशमध्ये एका सांस्कृतिक कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपून दिल्लीतील निवासस्थानी परतल्यानंतर ही दुर्दैवी घटना घडली. त्यांच्या अकस्मात निधनाच्या बातमीने भारतीय आणि नेपाळी चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. दार्जिलिंगमधील कलाकार, गोरखा समाजातील गायक तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
प्रशांत तमांग यांचा प्रेरणादायी प्रवास
प्रशांत तमांग यांनी 2007 साली इंडियन आयडॉल सीझन 3 ची ट्रॉफी जिंकत संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले. ते मूळचे अरुणाचल प्रदेशातील रहिवासी होते. त्यांच्या वडिलांचे एका अपघातात निधन झाले होते. वडील कोलकाता पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. दार्जिलिंग याठिकाणी जन्माला आलेला प्रशांत सुरुवातीला कोलकाता पोलिसांमध्ये कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होता. या पोलीस विभागातील ऑर्केस्ट्रामध्ये तो सहभागी व्हायचा. हीच संगिताची आवड जोपासत त्याने Indian Idol सारख्या मंचाद्वारे देशभरात नाव कमावले. रिअॅलिटी शोनंतर मिळालेल्या तुफान प्रसिद्धीनंतर प्रशांतने नेपाळी भाषेत विविध गाणीही रीलिज केली.
कुटुंबाची जबाबदारी लवकरच प्रशांत यांच्या खांद्यावर आली. वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी त्यांनी कोलकाता पोलीस दलात वडिलांची नोकरी स्वीकारली. नोकरी सांभाळत असतानाच त्यांनी इंडियन आयडॉल 3 मध्ये सहभाग घेतला आणि आपल्या आवाजाच्या जोरावर स्पर्धा जिंकली. एका सामान्य पोलीस कर्मचाऱ्यापासून देशभरात ओळख मिळवणारा गायक बनण्याचा त्यांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला.
प्रशांत तमांग यांच्या निधनाने संगीत आणि मनोरंजन विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली असून, चाहते आणि सहकारी कलाकार त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत.

