(रत्नागिरी)
मनसे अध्यक्ष श्री राजसाहेब ठाकरेंच्या आदेशाने तसेच सर्व वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना रत्नागिरी तालुका प्रमुख पदाधिकारी आढावा बैठक हॉटेल विवेक माळनाका, रत्नागिरी येथे रविवार दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी पार पडली. यावेळी आगामी निवडणुका शिवसेना (UBT) व मनसे यांच्या शिवयुतीमध्ये लढवण्याचा निर्णय सर्वसंमतीने घेण्यात आला. या बैठकीत आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका इच्छुक उमेदवार चाचपणी तसेच उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
मनसे रत्नागिरी तालुका अध्यक्ष श्री रुपेश जाधव यांच्या नेतृत्वात झालेल्या या आढावा बैठकीत माजी जिल्हा सचिव तथा जनहित कक्ष जिल्हा समन्वयक श्री. बिपीन शिंदे, तालुका उपाध्यक्ष श्री. राजू पाचकुडे, महिलासेना तालुका सचिव सौ.आकांक्षा पाचकुडे, जनहित कक्ष जिल्हा उपचिटणीस ॲड . माधवी पालकर, श्री. सागर पावसकर, आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांसहित सर्व विभाग अध्यक्ष, शाखा अध्यक्ष बहुसंख्येने उपस्थित होते.

