(रत्नागिरी)
GJC 95 गोल्डन फॅमिली वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. गेली अनेक वर्ष मैत्रीचे नाते जपण्यासाठी सर्व मित्रमंडळी वेगवेगळ्या कल्पना राबवून कलागुणांना वाव देण्यासाठी आणि स्नेहबंध वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतात. यावर्षी पाककला स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला. व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही प्रकारांमध्ये एकूण बारा स्पर्धकांनी सहभाग घेतला स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे
९५ पाककला स्पर्धा
व्हेज :
प्रथम – अंजली लिमये
द्वितीय – अंजली पिलणकर
तृतीय- संध्या सावंत
नॉनव्हेज :
प्रथम – अंजली पिलणकर
द्वितीय- जाई मयेकर
तृतीय- देवयानी शेट्ये
इतर सहभागी
लीना सावंत, मानसी कदम, नाजनीन पालेकर, हेमंत चोप्रा, राजेश जाधव
परीक्षक म्हणून हॉटेल पिझ्झा हाऊस मालक विनायक रसाळ यांनी काम पाहिले. स्पर्धेचे आयोजक म्हणून डॉ.आनंद आंबेकर, मंजिरी लिमये, संध्या सावंत, मयुरेश सावंत यांनी जबाबदारी सांभाळली.
बिपिन बंदरकर, सोनाली बंदरकर, ज्योती मुळ्ये, सत्यशील सावंत यांनी विशेष सहकार्य केले.