(राजापूर / तुषार पाचलकर)
गेली कित्येक वर्ष शालेय सैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या राजापूर तालुक्यातील पूर्व भागातील पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा पाचल येथील सरस्वती विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयातील वाडिया हॉल येथे उद्या रविवार दिनांक आठ सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आली होती, परंतू मान. जिल्हाधिकारी रत्नागिरी यांचेकडील आदेश क्रमांक उचिशा/ पोल -2/मनाई आदेश 2024 दिनांक 05 /09/2024 अन्वये महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951चे कलम 73(1)(3)आदेश परीत करण्यात आला असल्याने तसेच संस्थेच्या इतर सभासदांचा या सभेला विरोध असल्याने पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ पाचल या संस्थेची उद्याची वार्षिक सर्वसाधारण सभा रद्द करण्यात आल्याची माहिती संस्थेचे सहसचिव किशोरभाई नारकर यंच्याकडून देण्यात आली आहे.
या आधी देखील 31 मार्च 24 रोजी संस्थेची जनरल सभा आयोजित करण्यात आली होती परंतू तक्रारदार मोहन नारकर व इतर सभासदांनी आचारसंहितेचं कारणं देऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून तहसीलदार राजापूर यांच्याकडील आदेश क्रमांक /फौजदारी एसआर 05/2024 दिनांक 30 मार्च 24 रोजी ते 3 एप्रिल 2024 रोजी पर्यंत जुना कायदा फौजदारी प्रक्रिया संहिता 1073 चे कलम 144 चे मनाई आदेश लागू करण्यात आला होता म्हणून त्यावेळची सभा देखील रद्द करण्यात आली होती. राजापूर पोलीस प्रशासनाकडून नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या नोटीसामध्ये संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभा तसेच सदर संस्थेबाबत एकमत होतं नसल्याने निष्पन्न होतं असून दोन्ही पार्टी आपल्या मतावर ठाम असल्याने व सभा कालावधीत गौरी गणपती उत्सव साजरा करण्यात येणार असल्याने व सभेच्या दिवशी दीड दिवसाच्या गणपती मूर्ती विसर्जन कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे सदर सर्वसाधारण सभेमुळे गणेशोत्सव कालावधीमध्ये कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मा तहसीलदार, राजापूर यांनी दिनांक 7/9/2024 रोजीचे 00.01 वाजेपासून दिनांक 17/09/2024 चे रात्रौ 12.00 वाजेपर्यंत सदर परिसरामध्ये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 नुसार जमावबंदी आदेश लागू केलेला असून सर्वसाधारण सभेची परवानगी नाकारण्यात आलेली असल्याचे राजापूर तालुका पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांच्याकडून सांगण्यात आले आहे. याबाबत चे नोटीस संस्थेच्या महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर लावण्यात आल्याचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर उबाळे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.