(जाकादेवी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुका धम्मक्रांती कला मंचाची महत्त्वपूर्ण सभा त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंती कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर उपक्रमाच्या नियोजनासाठी रविवार ११ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता जाकादेवी खालगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे रत्नागिरी तालुक्यातील गाव प्रतिनिधींची महत्त्वपूर्ण सभा आयोजित करण्यात आली आहे.
८ फेब्रुवारी रोजी माता रमाई जयंती निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी ही महत्त्वाची सभा बोलावण्यात आली आहे. सभेस येताना गाव शाखांनी यापूर्वी धम्म क्रांती कला मंचामार्फत करण्यात आलेल्या कलामंडळे, वैयक्तिक कलाकार यांच्या माहिती संकलनासाठी दिलेल्या फॉर्ममध्ये माहिती भरून घेऊन येणे. तसेच पत्रात नमूद केल्याप्रमाणे आपल्या वाडीतील हयात असलेल्या व नसलेल्या कवी, गायक लेखक, अभिनयकार वाद्य वादक इत्यादी ज्येष्ठ कवींची नावे व त्यांच्या कार्याची माहिती व कार्यकाल, क्षेत्र इ. अद्यावत माहिती सोबत घेऊन येणे.
सदर सभेला तालुका कार्यकारिणीतील पदाधिकारी, सदस्य, सल्लागार यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन धम्मक्रांती कला मंच रत्नागिरीचे उपक्रमशील तालुकाध्यक्ष, कवी व गायक आयु. रविकांत सोनू पवार, चिटणीस सतिश कदम, पदाधिकारी मिलिंद कांबळे, प्रशांत मोहिते, प्रशांत जाधव यांनी केले आहे.

