(रत्नागिरी)
तालुक्यातील तरवळ- बौद्धवाडी आणि पाली-मराठवाडा येथील दोन तरुणांनी अज्ञात कारणातून राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी घडली.
विशाल अशोक पवार (३६, रा. तरवळ-बौद्धवाडी, रत्नागिरी) आणि जितेंद्र सुनील सावंत (३३, रा. पाली मराठवाडा, रत्नागिरी) अशी त्या दोघांची नावे आहेत. याबाबत विशालचे वडील अशोक पवार यांनी तर जितेंद्रच्या चुलत भावाने ग्रामीण पोलिस स्थानकात माहिती दिली. त्यानुसार, मंगळवारी सकाळी अशोक पवार यांचा मुलगा विशाल याने अज्ञात कारणातून राहत्या घराच्या हॉलमध्ये नायलॉन दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. जितेंद्र सावंत यानेही अज्ञात कारणातून आपल्या घराच्या मागील बाजूच्या पडवीमध्ये नायलॉन दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. जितेंद्र सावंत याला दारुचे व्यसन होते. त्याने आई वडिलांना शिवीगाळ करुन गळफास घेऊन आत्महत्या केली.
याबाबत दोघांच्या नातेवाइकांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांना माहिती देली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेहांचा पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी ग्रामीण पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.