(वार्ताहर / पाली)
पालीचे सुपुत्र आ.किरण सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त पालीत
भव्य दिव्य राज्यस्तरीय किंगमेकर केसरी बैलगाडी शर्यतीचे आयोजन देवतळे येथे करण्यात आले आहे. या स्पर्धा बुधवार दि.७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता होणार आहेत. ही स्पर्धा चार गटांमध्ये होणार असून प्रवेश फी घाटी गट १०००/-रूपये. गावठी गट ५००/-रूपये अशी आहे.
स्पर्धेतील राज्यस्तरीय गटात प्रथम क्रमांक रुपये २१,०००/- व मानाची ढाल,द्वितीय क्रमांक १५,०००/- व मानाची ढाल, तृतीय क्रमांक १२,०००/- व मानाची ढाल,चतुर्थ क्रमांक १०,०००/- व मानाची ढाल, पाचवा क्रमांक ७,०००/- व मानाची ढाल, सहावा क्रमांक ५,०००/- व मानाची ढाल, सातवा क्रमांक ३,०००/- व मानाची ढाल असे असतील. जिल्हास्तरीय गटात प्रथम क्रमांक १२,०००/- व मानाची ढाल, द्वितीय क्रमांक १०,०००/- व मानाची ढाल,तृतीय क्रमांक ८,०००/- व मानाची ढाल,चतुर्थ क्रमांक ७,००० /- व मानाची ढाल,पाचवा क्रमांक ५,०००/- व मानाची ढाल,सहावा क्रमांक ३,०००/- व मानाची ढाल, सातवा क्रमांक २,०००/- व मानाची ढाल असे आहेत.
तालुकास्तरीय गटात प्रथम क्रमांक ८,०००/- व मानाची ढाल,द्वितीय क्रमांक ६,०००/- व मानाची ढाल, तृतीय क्रमांक ४,०००/- व मानाची ढाल, चतुर्थ क्रमांक ३,०००/- व मानाची ढाल, पाचवा क्रमांक २,०००/- व मानाची ढाल, सहावा क्रमांक १,०००/- व मानाची ढाल, सातवा क्रमांक १,०००/- व मानाची ढाल असे आहेत.
गावठी गटामध्ये प्रथम क्रमांक ८,०००/- व मानाची ढाल, द्वितीय क्रमांक ६,०००/- व मानाची ढाल, तृतीय क्रमांक ४,०००/- व मानाची ढाल,चतुर्थ क्रमांक ३,०००/- व मानाची ढाल,पाचवा क्रमांक २,०००/- व मानाची ढाल,सहावा क्रमांक १,०००/- व मानाची ढाल, सातवा क्रमांक १,०००/- व मानाची ढाल असे आहेत.
स्पर्धेच्या नियम व अटी पुढीलप्रमाणे असणार आहेत सहभागी बैलाचे लंपी प्रमाणपत्र व मालकासोबत फोटो आणि मालकाचे आधारकार्ड झेरॉक्स आवश्यक. नोंदणी सकाळी ७.०० ते १०.०० पर्यंत असेल व स्पर्धा दुपारी ११.०० वाजता सुरु होईल.
स्पर्धेदरम्यान बैल व जॉकी यांना कोणत्याही प्रकारची दुखापत झाल्यास त्यास मंडळ आयोजक जबाबदार राहणार नाहीत.एक जॉकी कितीही गाड्या हाकू शकतो. जिल्हास्तरीय स्पर्धेत दोन्ही बैल जिल्ह्यातील असावेत.तालुकास्तरीय स्पर्धेत दोन्ही बैल तालुक्यातील असावेत.
गावठी गट स्पर्धा ११.०० वाजता सुरू होईल.स्पर्धकांना कोणताही आक्षेप असल्यास तो स्पर्धा सुरू होण्यापूर्वी नोंदवावा नंतर कोणतीही तक्रार घेतली जाणार नाही. स्पर्धा पूर्णत शासनाने ठरवून दिलेल्या नियम व अटी शर्ती यांच्या अधीन राहून पार पडेल.
स्पर्धेच्या नावनोंदणी साठी संपर्क संपर्क रोहित सावंतदेसाई,अनिल शिंदे, सागर सावंतदेसाई, नाना राऊत यांच्याशी करायचा आहे. स्पर्धेचे यु ट्यूबवर थेट प्रक्षेपण समालोचक रणजीत पाटील करणार आहेत.या स्पर्धांचे आयोजन पाली युवा मंच, शिवसेना व युवासेना पाली हातखंबा विभाग यांनी केले आहे.

