(रत्नागिरी)
मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या रक्तपेढीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास मनसेचे पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिक आणि नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या उपक्रमात अनेक युवक आणि कार्यकर्त्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी जपली. हा सामाजिक उपक्रम यशस्वी ठरण्यासाठी मनसे पदाधिकाऱ्यांनी मोठी जबाबदारी पार पाडली.
या शिबिरात तालुका अध्यक्ष श्री. रुपेश जाधव, शहर संघटक अमोल श्रीनाथ, तालुका उपाध्यक्ष सौरभ पाटील, राजू पाचकुडे, विशाल चव्हाण, महिला सेना तालुका अध्यक्षा सौ. अश्विनी चव्हाण, तसेच सचिन सांडीम, सोम पिलणकर, महेश घाणेकर, राजू नंदाने, अक्षय सुतार, निखिल आंब्रे यांच्यासह अनेक मनसे पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
यावेळी मनसे तालुका अध्यक्ष रुपेश जाधव यांनी सांगितले की, “राजसाहेब ठाकरेंच्या विचारांना कृतीत उतरवण्यासाठी आणि सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी मनसे कायम कटिबद्ध आहे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून, या शिबिराद्वारे अनेकांचे प्राण वाचण्यास मदत होईल, हीच खरी राजसाहेबांना आदरांजली आहे.”
शिबिर यशस्वी करण्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारीवर्गाचे विशेष सहकार्य लाभले. शिबिरात रक्तदात्यांची नोंदणी आणि तपासणी व्यवस्थित पार पडली.