(चिपळूण)
शहराचे सुप्रसिद्ध जागृत श्रध्दास्थान ग्रामदैवत श्री जुना काळभैरव देवस्थान ट्रस्ट अंतर्गत श्री काळभैरव पंचायतन परिवारापैकी श्री देवी भवानी मंदिर (श्री क्षेत्र गांधारेश्वर ) चिपळूण येथे श्री शाकंभरी पौर्णिमा ( पौष पौर्णिमा ) उत्सव प्रतिवर्षीप्रमाणे धार्मिक सांस्क्रुतिक कार्यक्रमाच्या आयोजनानेउदय शनिवार दि . ०३ जानेवारी रोजी साजरा करण्यात येत आहे.
यानिमित्त सकाळी ६ वाजता श्री भवानी मातेची पंचामृती पूजा , अभिषेक आदी धार्मिक विधी , सकाळी ७ ते १२:३० पर्यत श्री सत्य अंबा पूजा, देवी सूक्त हवन , पूर्णःहुती , आरती आदी* , *सकाळी १० वाजता श्री सत्यनारायण पूजा व तीर्थप्रसाद , दुपारी १ ते ३ महाप्रसाद , सायंकाळी ४ ते ६ संगीत भजन श्री विश्वकर्मा प्रासादिक महिला संगीत भजन मंडळ , चिपळूण , सायंकाळी ६ ते ८ कै. वामनराव सांडविलकर संस्थापित , स्वरदर्शन कलाकुंज प्रस्तुत संगीत स्वरसुमनांजली कार्यक्रम , रात्रौ ८ :३० वाजता महाआरती आदी कार्यक्रम होतील.
ग्रामदैवता श्री देवी भवानी मातेच्या शाकंभरी पौर्णिमा उत्सवात भक्तजन व नागरिकानी त्याचप्रमाणे श्री देव भैरी ( काळभैरव ) व श्री देवी भवानी ( भैरी भवानी ) कुलदैवत असणाऱ्या भक्तजनांनी सहभागी होऊन श्री देवी भवानी मातेच्या सेवेच्या अपूर्व पर्वणीचा लाभ घ्यावा .असे आवाहन श्री ग्रामदैवत जुना काळभैरव देवस्थान ट्रस्ट , चिपळूण विश्वस्त मंडळातर्फे करण्यात येत आहे.

