(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर तालुक्यातील पाचल येथे आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हास्तरीय व विभागस्तरीय भव्य खुल्या गटातील ग्रुप डान्स स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. हा क्रीडा महोत्सव सोमवार, 5 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता पाचल ग्रामपंचायत हॉल येथे सुरू होणार आहे.
या स्पर्धेत जिल्हा व विभाग पातळीवरील नामांकित संघ सहभागी होणार असून, विजेत्या व उपविजेत्या संघांसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. जिल्हास्तरीय खुल्या गटात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी रोख रक्कम व चषक देण्यात येणार आहेत. तसेच विभागस्तरीय खुल्या गटातील विजेत्यांनाही स्वतंत्र बक्षिसे प्रदान करण्यात येणार आहेत.
स्पर्धेचे आयोजन शिवसेना तळवडे – पाचल विभाग यांच्या वतीने करण्यात आले असून, या कला स्पर्धेमुळे परिसरातील युवकांना व्यासपीठ मिळणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. स्पर्धेसाठी ठरवण्यात आलेल्या नियमांनुसार पंचांचा निर्णय अंतिम राहणार असून, स्पर्धकांनी वेळेचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे.
या स्पर्धेसाठी बक्षीस हे पुढील प्रमाणे आहेत. जिल्हास्तरीय खुला गट प्रथम पारितोषिक ११,१११ आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक ७७७७/- व आकर्षक चषक, तृतीय पारितोषिक ५५५५/- व आकर्षक चषक
विभागिस्तरीय खुला गट प्रथम पारितोषिक ७७७७/- व आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक ५५५५/- व आकर्षक चषक, तृतीय पारितोषिक ३३३३/- व आकर्षक चषक
अधिक माहितीसाठी सिद्धार्थ जाधव सर 9420153996 7709932904, गवरे सर 9730165678 विहंग खानविलकर 7588327767 याच्याशी संपर्क करावा, असे कळविण्यात आले आहे.
स्पर्धेचे नियम व अटी:- १) पंचांचा निर्णय अंतिम राहील. २) स्पर्धकाने स्पर्धा चालु होण्याअगोदर १ तास हजर राहावे. ३) स्पर्धकाने स्वतःचे साहित्य स्वतः घेऊन येणे. ४) कार्यक्रमात बदल करण्याचे अधिकार स्पर्धा आयोजकांकडे राहील. ५) विभागियस्तरीय पहिल्या नोंदणी केलेल्या १० संघांना प्राधान्य देण्यात येईल. ६) जिल्हास्तरीय पहिल्या नोंदणी केलेल्या १० संघांना प्राधान्य देण्यात येईल.
या स्पर्धांमुळे पाचल परिसरात नृत्य प्रेमी व युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. अधिक माहितीसाठी व सहभाग नोंदणीसाठी आयोजकांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

