( तिरुवनंतपूरम )
आयसीसी महिला टी-20 क्रमवारीत नंबर वन गोलंदाज ठरल्यानंतर दीप्ती शर्माने आणखी एक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावे केला आहे. महिला आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारी गोलंदाज बनण्याचा विश्वविक्रम दीप्तीने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात प्रस्थापित केला.
या सामन्यात विकेट मिळवत दीप्ती शर्माने १५२ विकेट्सचा टप्पा ओलांडला आणि ऑस्ट्रेलियाच्या मेगन शुटला मागे टाकत जागतिक विक्रमावर आपलं नाव कोरलं. यामुळे दीप्तीने २०२५ वर्षाचा शेवट अविस्मरणीय कामगिरीने केला आहे.
दीप्ती शर्माची कामगिरी केवळ विकेट्सपुरती मर्यादित नसून दर्जेदार गोलंदाजी (इकॉनॉमी ६.१) हे तिच्या सातत्याचं मोठं उदाहरण आहे. कमी सामन्यांमध्ये अधिक विकेट्स घेत तिने जागतिक दर्जा पुन्हा एकदा सिद्ध केला आहे.
महिला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स (टॉप ५)
1. दीप्ती शर्मा (भारत)
सामने: १३३ | विकेट्स: १५२ | इकॉनॉमी: ६.१
2. मेगन शुट (ऑस्ट्रेलिया)
सामने: १२३ | विकेट्स: १५१ | इकॉनॉमी: ६.४
3. हेन्रियेटा इशिम्वे (युगांडा)
सामने: ११७ | विकेट्स: १४४ | इकॉनॉमी: ४.३
4. निदा दार (पाकिस्तान)
सामने: १६० | विकेट्स: १४४ | इकॉनॉमी: ५.७
5. सोफी एक्लेस्टोन (इंग्लंड)
सामने: १०१ | विकेट्स: १४२ | इकॉनॉमी: ६.०
दीप्ती शर्माच्या या विक्रमामुळे भारतीय महिला क्रिकेटच्या इतिहासात नवा सुवर्णअध्याय जोडला गेला असून जागतिक स्तरावर भारताची गोलंदाजी पुन्हा एकदा केंद्रस्थानी आली आहे.

