( रत्नागिरी )
आर. एच. पी. फाउंडेशनच्या सहकार्याने आणि निओमोशन, चेन्नई यांच्यातर्फे साईनगर, कुवारबाव येथे एस. के. नाकाडे यांच्या निवासस्थानी निओमोशन दुचाकी दुरुस्ती शिबिर पार पडले. निओमोशनमुळे दिव्यांगाना रोजगार मिळाला. परंतु या दुचाकी वाहनांची दुरुस्ती अत्यावश्यक असते..ग्रामीण भागातील दिवांगाना त्यासाठी मुंबईला जावे लागे.त्यांना इतक्या लांब जाण्यापेक्षा जवळच त्याचा लाभ घेण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिराचा लाभ सलिक भाटकर, खुतबुद्दीन मुकादम, भरत लोहकरे, श्रावणी शिंदे, वर्षाराणी सावंत, भारती भायजे, मुस्कान नाकाडे, सादिक नाकाडे, सुबोध जाधव आदी निओमोशन दुचाकीधारकांनी लाभ घेतला.
यामध्ये निओमोशन गाडीची पूर्ण तपासणी करून सर्व्हिसिंग करून दिले. ज्यांच्या गाडीचे भाग खराब झाले होते ते बदलून दिले. या कामासाठी निओमोशन चेन्नईचे तंत्रज्ञ ऋषिकेश धनरे आणि प्रदीपकुमार सरोज आले होते. त्यांनी परत एकदा निओमोशनविषयी सर्वांना सविस्तर माहिती दिली. निओमोशनमुळे दिव्यांगाना रोजगार मिळाला. दिव्यांग स्वतः च्या पायावर उभा राहिला, आत्मसान्मानाने जगू लागला. निओमोशनमध्ये काही बिघाड झाला तर दुरुस्तीसाठी मुंबईला जावे लागायचे. आता निओमोशन डोअर टू डोअर जाऊन सर्व्हिस देते त्यामुळे दिव्यांगाना खूप फायदा झाला आहे.
या शिबिरासाठी चिपळुणचे अशोक भुसकुटे, चालक हेमंत भोसले, रिक्षाचालक संदीप धुमाळी, कुवारबाव ग्रामपंचायत माजी सदस्य सुरेंद्र चव्हाण उपस्थित होते. हे शिबिर पूर्णत्वास नेण्यासाठी आर. एच. पी. फाउंडेशनचे अध्यक्ष सादिक नाकाडे, सदस्य समीर नाकाडे, मुस्कान नाकाडे, अतिका नाकाडे, अशोक भुसकुटे यांनी खूप मेहनत घेतली. उपस्थित सर्वांची चहा, नाष्टा, जेवणाची सोय आरएचपी फाउंडेशनतर्फे केली होती.
अशोक भुसकुटे यांनी चिपळूण तालुक्यातील जास्तीत जास्त दिव्यांगना निओमोशन मिळवून देणे आणि पुढील वर्षी शिबिर चिपळूणमध्ये ठेवण्याची इच्छा व्यक्त केली. सुरेंद्र चव्हाण यांनी आरएचपी फाउंडेशनचा हा उपक्रम खूप स्तुत्य असल्याचे सांगितले. सादिक नाकाडे यांनी सर्वांची ओळख करून दिली आणि शिबिराचा उद्देश समजावून सांगितला.

