(रत्नागिरी)
कराटे असोसिएशन रत्नागिरी संघटनेमार्फत कराटे स्पर्धेचे आयोजन दि. 25/12/2025 रोजी जिल्हा क्रीडा संकुल बॅडमिंटन हॉल छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम मारुती मंदिर रत्नागिरी येथे करण्यात आली होती. सदर स्पर्धेचे उद्घाटन नगराध्यक्षा सौ. शिल्पा सुर्वे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले, तसेच उपस्थित मान्यवरांमध्ये श्री. बिपिन बंदरकर (शिवसेना शहर प्रमुख ) व नगरसेविका सौ.प्रीती सुर्वे, नगरसेविका सौ.सायली पाटील, नगरसेविका सौ. मेधा कुलकर्णी, सौ. आफरीन होडेकर, शिवसेना जिल्हा कार्यालय प्रमुख श्री. प्रशांत सुर्वे यांची उपस्थिती लाभली,
सर्व मान्यवरांचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते शाळ श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.
सदर स्पर्धेत रत्नागिरीतील एम.एम.ए फिटनेस सेंटर, फाटक हायस्कूल, कॉन्व्हेंट हायस्कूल उद्यम नगर, जी.जी.पी.एस स्कूल, माने इंटरनॅशनल स्कूल, कॉन्व्हेंट हायस्कूल शहर, पुष्पदत्त स्कूल,दामले विद्यालय, रा. भा. शिर्के हायस्कूल, सेंट थॉमस स्कूल, मुकुंद माधव विद्यालय,फातिमा सी. बी. सी. कॉन्व्हेंट स्कूल, मराठा मंदिर ग्लोबल स्कूल, येथील शाळांमधील एकूण 200 पेक्षा जास्त कराटे खेळाडूंनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतलेला होता.
कराटे असोसिएशन रत्नागिरी चे अध्यक्ष श्री.जावेद मिरकर,सचिव श्री. सूरज बने, खजिनदार. श्री. अरुण बेग, सदस्य रितेश बेग,नौशीन कापडी यांचे मौलाचे सहकार्य लाभले तसेच जिल्हास्तरीय कराटे स्पर्धा 2025 ही शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी पंच म्हणून कु. आयान मिरकर, तेजस जाधव, प्रथम बेग, रिया माचकर, प्रेम बेग, दिव्य यादव, ध्रुव बसनकर, स्पर्श लिंगायत, स्पंदन लिंगायत, आराध्या चव्हाण, लक्ष्मी पवार, फातिमा बुडये, झैद बुड्ये, श्लोक सावंत, आर्या पवार, कार्तिक राठोड, रोमित घोसाळे या सर्वांच्या सहकार्यामुळे जिल्हास्तरीय कराटे स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न करण्यात आली तसेच सदर स्पर्धेचे उद्घाटनाचे सूत्रसंचालन प्रशांत जाधव सर यांनी केले.
सदर स्पर्धेमधील विजयी खेळाडूंची पुढील स्पर्धेसाठी व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्वांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

