(कळझोंडी / किशोर पवार)
रत्नागिरी तालुक्यातील वाटद खंडाळा येथील माध्यमिक विद्यालय वरवडे भाग शाळा वाटद खंडाळा येथील श्रीमती पार्वती शंकर बापट माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थीनी कुमारी पुजा संदीप जाधव हिची १५ वर्षाखालील वर्षाखालील मुलींच्या सिझन बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाल्याने तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. रत्नागिरी मुलींच्या सीझन बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी कुमारी पुजा जाधव ही ११ ते २० सप्टेंबर या कालावधीत पुणे येथे होणाऱ्या क्रिकेट स्पर्धेसाठी रवाना होणार आहे.
पुजा संदीप जाधव ही वाटद खंडाळा माध्यमिक विद्यालयात इयत्ता ९ वी मध्ये शिक्षण घेत आहे. अभ्यासाबरोबरच तिला क्रीडा क्षेत्रात आवड असल्याने तिने क्रिकेट क्षेत्रात उल्लेखनीय अशी कामगिरी केली आहे. तिला प्रशालेतील अष्टपैलू क्रीडाशिक्षक डॉ .राजेश महादेव जाधव यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. पुजाची आई , साक्षी जाधव, वडील संदीप जाधव यांचे उत्तम प्रोत्साहन लाभत आहे.
पुणे येथे होणाऱ्या १५ वर्षाखालील मुलींच्या सिझन बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी ती रत्नागिरी जिल्हा मुलींच्या क्रिकेट संघातून आपले कौशल्य दाखविण्याची संधी प्राप्त झाली आहे. पुजा जाधव हिला खंडाळा पंचक्रोशीतील क्रिकेटप्रेमी नागरिक, प्रशाला व शिक्षण संस्थेच्या वतीने तिचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

