(रत्नागिरी)
ख्वाजा गरीब नवाज अजमेर (राजस्थान) यांच्या 814 व्या ऊर्स निमित्त दावते इस्लामी शाखा रत्नागिरी यांच्यातर्फे कोकण नगर फैजाने अत्तार येथे आज 25 डिसेंबर रोजी रात्री 21:00 वाजता इज्तिमा चे आयोजन करण्यात आले आहे.
ख्वाजा गरीब नवाज यांचा (814 )वा ऊर्स म्हणजेच त्यांची वार्षिक पुण्यतिथी जी अजमेर शरीफ येथे मोठ्या उत्साहात साजरी होते, या सोहळ्याची सुरुवात जुलूस ने होते. यामध्ये देशातील हजारो भाविक सहभागी होतात. हा ऊर्स साधारणपणे इस्लामिक कॅलेंडरनुसार रजब महिन्याचा पहिल्या सहा दिवसात येतो. त्यामध्ये दर्गावर विशेष प्रार्थना आणि कार्यक्रम होतात.
उर्स म्हणजे प्रेम, शांती आणि एकतेचे प्रतीक मानले जाते. गरीब नवाज यांना गरिबांचा मदतगार असे संबोधले जाते. कारण त्यांनी आपले जीवन आणि गरजू लोकांसाठी समर्पित केले. सदर इज्तिमासाठी सर्व मुस्लिम बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन दावते इस्लामी शाखा रत्नागिरी तसेच गरीब नवाज रिलीफ़ फाउंडेशन यांनी केले आहे

