(मुंबई)
महाराष्ट्रातील २८८ नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा अधिकृत निकाल राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. या निकालानुसार भारतीय जनता पार्टीने (भाजप) नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या संख्येत राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे, तर शिवसेना ठाकरे गट सहाव्या क्रमांकावर गेला आहे.
राज्यातील एकूण ६८५१ जागांपैकी भाजपचे २४३१ नगरसेवक निवडून आले असून पक्षाने ११७ नगराध्यक्ष पदांवर विजय मिळवला आहे. महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांचे मिळून एकूण ४४२२ नगरसेवक निवडून आले आहेत. महायुतीकडे एकूण २०७ नगराध्यक्ष पदे आहेत.
शिवसेना शिंदे गटाचे १०२५ तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे ९६६ नगरसेवक विजयी झाले आहेत. महाविकास आघाडीत काँग्रेसने आघाडी घेत २८ नगराध्यक्षांसह ८२४ नगरसेवक निवडून आणले आहेत.
या तुलनेत शिवसेना ठाकरे गटाचे २४४ तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे २५६ नगरसेवक निवडून आले आहेत. नगरपालिकांमधील एकूण संख्याबळ पाहता भाजप पहिल्या, शिंदे गट दुसऱ्या आणि अजित पवार गट तिसऱ्या क्रमांकावर आहे.
नगरपालिका आणि नगरपंचायतींमधील पक्षनिहाय संख्याबळ
एकूण जागा : ६८५१
भाजप : २४३१
शिवसेना (शिंदे गट) : १०२५
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) : ९६६
काँग्रेस : ८२४
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) : २५६
शिवसेना (ठाकरे गट) : २४४
इतर व छोटे पक्ष : ६०५
अपक्ष : ३६१
आम आदमी पार्टी : १
बसपा : ८
मार्क्सवादी कम्युनिस्ट : १
(संदर्भ : राज्य निवडणूक आयोगाची अधिकृत आकडेवारी)

