( संगमेश्वर / प्रतिनिधी )
लायन्स क्लब ऑफ सावर्डे यांनी या वर्षापासून सुरु केलेल्या लायन्स सहोत्सवाची शानदार सुरवात झाली असून सावर्डे परिसरातील सुमारे ५० गावातील नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. दररोज हजारो नागरीक या लायन्स महोत्सवातील विविध खाद्य पदार्थाचा आस्वाद घेत आहेत. याच बरोबर विविध घरगुती, संसारोपयोगी वस्तूची खरेदी करीत आहेत.
मुलांसाठी असलेल्या फन फेअर मधील मधील गेमझोनचा सर्वजण आनंद घेत आहेत. विशेष म्हणजे या सायन्स महोत्सवाच्या ग्रामीण नागरिकांच्या मनोरंजनासाठी नृत्य, नमन होम मिसिस्टर, लावणी असे विविध कार्यक्रम सादर केले जात आहेत. प्रथमच अशा प्रकारचा लायन्स महोत्सव होत असल्यामुळे दिवसेदिवस नागरिकांची तुफान गर्दी होत आहे. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने लायन्स महोत्सव सुरु असून याचे सर्व श्रेय लायन्स क्लब ऑफ सावर्डेच्या पदाधिकाऱ्यांचे आहे. विशेष म्हणजे हा लायन्स महोत्सव यशस्वी होण्यासाठी या उपक्रमाचे चेअरमन ला. कृष्णकांत पाटील, व ला. सतीश सावर्डेकर , ला. देवराज गरगटे यांनी विशेष परिश्रम घेतलेले आहेत. लायन्स महोत्सवामध्ये दररोज १५ लकी ड्रा कुपन काढून यशस्वी झालेल्या सर्वांना १५ बक्षिसांचे वाटप करण्यात येत आहे. दररोज एक पैठणी साडी बक्षीस विजेत्यांना देण्यात येते. आहे.
लायन्स महोत्सवाचे उद्घाटन रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन डॉ. तानाजीराव चारगे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्यावेळी लायन्स क्लब ऑफ सावर्डेला शुभेच्छा देताना ते म्हणाले की, लायन्स क्लब ही आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणारी समाजोपयोगी संस्था असून त्यांची आपल्या कार्यक्रमाद्वारे सेवा करणे हे प्रमुख ध्येय आहे. त्यामुळे सावर्डे परिसरातील ग्रामीण भागातील नागरिकांसाठी अंधत्व निवारण, मधुमेह, पर्यावरण, नैसर्गिक आपत्ती निवारण आधी सेवा कार्य निश्चितपणे सावर्डेचा लायन्स क्लब करेल, याबद्दल मला खात्री आहे आणि म्हणूनच सावर्डेच्या या लायन्स क्लबची उत्तरोत्तर प्रगती होण्यासाठी यापुढे सदैव त्यांना सहकार्य करेल असे आश्वासन देऊन त्यांनी लायन्स क्लब ऑफ सावर्डीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना शुभाशीर्वाद दिले.
याप्रसंगी प्रांतपाल एम जे.एफ. ला. वीरेंद्र चिखले, चिपळूण पंचायत समितीच्या माजी सभापती , सौ. पूजा शेखर निकम, हास्य जत्रा फेम कोकणचा पारसमणी प्रभाकर मोरे, सावर्डे ग्रामपंचायत सरपंच समीक्षा बागवे, सावर्डे लायन्स क्लबचे अध्यक्ष प्रा. प्रकाश राजेश शिर्के, सचिव राजेश कोकाटे, खजिनदार डॉ. अरुण पाटील, संस्थापक अध्यक्ष ला. गिरीश कोकाटे , या उपक्रमाचे चेअरमन झोन चेअरमन ला. डॉ. कृष्णकांत पाटील, ला. सतीश सावर्डेकर, ला. देवराज गरगटे, ला. सौ. अदिती निकम, ला. सौ. दर्शना पाटील , डॉ. अमोल निकम, डॉ. चिकटे , ला. तुषार मोहिते, ला. अशोक बीजीतकर, ला. मिलिंद तेटांबे, ला. सिताराम कदम, ला. विजय राजेशिर्के यांच्याबरोबरच ग्रामीण परिसरातील नागरिक आपल्या कुटुंबीयांसह बहुसंख्येने उपस्थित होते.
त्याचप्रमाणे पुणे येथील ४२ किलोमीटर आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन या धावण्याच्या शर्यतीत कुडप गावची कु साक्षी जड्याळ हिने इथिओपियाच्या महिला धावपटूला मागे टाकत प्रथम क्रमांक मिळवल्या बद्दल तिचा लायन्स क्लब ऑफ सावर्डेच्या वतीने रोख पारितोषिक, व शाल श्रीफळ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला.

