(रत्नागिरी)
पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या जिल्हा परिषद सेस योजना अंतर्गत विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 5 जानेवारी 2026 आहे. तरी योजनांचा अधिक माहितीसाठी पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती, रत्नागिरी तसेच नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा, असे आवाहन गट विकास अधिकारी, तसेच पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती, रत्नागिरी यांनी केले आहे.
जिल्हा परिषद सेस योजनेअंतर्गत 50% अनुदानावर दुधाळ गाय/सुधारित जातीची म्हैस पुरवठा करणे, 50% अनुदानावर शेळी गट (5 शेळ्या + 1 बोकड ) वाटप करणे, 90% अनुदानावर स्वच्छ गोठ्याकरिता रबरमॅट वाटप करणे या योजनांसाठी ऑफलाईन पध्दतीने अर्ज घेण्याची प्रक्रिया सन 2025-26 या वर्षात राबविली जात आहे. रत्नागिरी तालुक्यातील पशुपालक बांधव, सुशिक्षित बेरोजगार युवक/युवती व महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी दि. 5 जानेवारी 2026 पर्यंत ऑफलाईन पध्दतीने अर्ज दाखल करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती रत्नागिरी मार्फत करण्यात येत आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
आधारकार्ड सत्यप्रत, रहिवाशी दाखला (स्वयंघोषणापत्र), अपत्य दाखला (स्वयंघोषणा पत्र), दारिद्रय रेषेखालील/ दिव्यांग असल्यास दाखला, रेशनकार्ड सत्यप्रत, सातबारा उतारा (3 महिन्याच्या आतील) (7/12 उतारामध्ये नाव नसल्यास नावे असणाऱ्यांचे संमती पत्र रुपये 5/- कोर्ट फी स्टॅम्प लावून), पॅनकार्ड सत्यप्रत,
बँक खाते पासबुक सत्यप्रत, बंधपत्र (प्रस्ताव मंजूर झालेवर विहित नमुन्यात).
जि. प. सेस योजने अंतर्गत 50 टक्के अनुदानावर देशी/ सुधारीत गायी/म्हैशी/ पारडयांचा पुरवठा करणे (एक दुधाळ जनावर) साठी 35 हजार रुपये, जि. प. सेस योजने अंतर्गत 50 टक्के अनुदानावर शेळीगट (5 शेळया + 1 बोकड ) पुरवठा करणे साठी 19 हजार रुपये, जि. प. सेस योजने अंतर्गत 90 टक्के अनुदानावर स्वच्छ गोठ्याकरिता रबरमॅट पुरवठा करण्यासाठी अनुदान रक्कम रूपये 3 हजार 150/- (अंदाजित).

