(देवळे / प्रकाश चाळके)
संगमेश्वर तालुक्यातील देवळे जंगलवाडी येथील मनोहर धोंडू गार्डी यांनी दत्त जयंती व दत्त जन्मोत्सव या उत्सवाचे औचित्य साधून सात आसरांचे मंदिर ही स्थापन केले. हे छोटेखानी मंदिर आणि सात आसरांची सुबक मूर्तींची स्थापना दत्त मंदिराच्या बाजूलाच केली आहे.
मनोहर गार्डी हे दत्तभक्त असून गेल्या अनेक वर्षे दत्तसेवा करत आहेत. या दत्त जयंती निमित्त सदर मंदिराचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. सतत दोन दिवस हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याच दत्त मंदिराशेजारी छोटेखानी असे मंदिर बांधून त्यामध्ये सुंदर अशा सात आसरांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे.
या सात आसरांच्या मंदिराबाबत मनोहर गार्डी यांनी एक छोटी कहानी सांगितली. या मंदिरा शेजारी भला मोठा पाषाण व भुयार असून हे जमिनीत असल्याचे सांगितले. आपल्या पूर्वजांपासून ते असून त्यावर आज सात आसरांचे मंदिर बांधल्याचे त्यांनी सांगितले. असे सातारांचे मंदिर या पंचक्रोशीमध्ये नसल्याने अनेक भक्तांनी त्यांचे मनोभावे दर्शन घेतले ल. या उत्सवानिमित्त महाप्रसादाचेही आयोजन केले होते. अनेक भक्तांनी त्याचा लाभ घेतला.

