(रत्नागिरी / प्रतिनिधी)
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 69 वा महापरिनिर्वाण दिन दिनांक 5 डिसेंबर रात्री 10 वाजल्या पासून दिनांक 6 डिसेंबर 2025 पर्यंत रत्नागिरी येथील, सिव्हिल हॉस्पिटल शेजारील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ, थिबा राजा कालीन बुद्धविहार बचाव संघर्ष समिती ता. जि. रत्नागिरी यांच्या विद्यमाने साजरा होणार आहे.
दिनांक 5 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजता समाजातील प्रबोधनकार गायक यांचे श्रद्धांजली पर गीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच रात्री 12 वाजता थिबा राजा कालीन बुद्धविहार बचाव संघर्ष समितीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समता सैनिक दलाच्या सलामीने मानवंदना देण्यात येणार आहे. दि. 6 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी दिनांक 5 डिसेंबर 2025 रोजी रात्री 12 वाजता रत्नागिरीतील सर्व बांधवानी अभिवादन करण्यास उपस्थित राहावे असे आवाहन थिबा राजा कालीन बुद्धविहार बचाव संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

