(चाफे / हरेश गावडे)
मोहिनी मुरारी शिक्षण संस्था मालगुंड संचलित, मोहिनी मुरारी मयेकर कला व वाणिज्य महाविद्यालय चाफे येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे श्रमसंस्कार, श्रमदान निवासी शिबिर सोमवार दिनांक 17 नोव्हेंबर 2025 ते रविवार दिनांक 23 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये माध्यमिक विद्यामंदिर, व कनिष्ठ महाविद्यालय जयगड नांदिवडे येथे संपन्न झाले.
सदर शिबिराचे उद्घाटन मोहिनी मुरारी शिक्षण संस्था मालगुंड या संस्थेचे कार्याध्यक्ष रोहित मयेकर यांच्या नेतृत्वाखाली संस्थेचे खजिनदार सुरेंद्र माचिवले व महाविद्यालयाच्या प्राचार्या स्नेहा पालये, यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी माध्यमिक विद्यामंदिर जयगड हायस्कूल चे सहाय्यक शिक्षक निवास पाटील, सहाय्यक शिक्षक कुणाल तडवी, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक सुयोग मोहिरे, सहाय्यक प्राध्यापिका तेजश्री रेवाळे आणि स्वयंसेवक उपस्थित होते.
राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत आयोजित, करण्यात आलेल्या शिबिराच्या कालावधीत विद्यार्थ्यांनी सकाळ सत्रात नांदिवडे गावातील सुमारे दोन किलोमीटर लांबीचा समुद्र किनाऱ्यावरील प्लास्टिक कचरा, गोळा करून किनाऱ्याची स्वच्छता केली. तसेच जयगड किल्ल्यातील प्लास्टिक कचरा, किल्ल्यावरील गवत व किल्ल्याच्या सभोवताली वाढलेली झाडी तोडून किल्ल्याची साफसफाई करण्यात आली. कराटेश्वर मंदिर परिसर व भक्त निवासाचा परिसर साफ करण्यात आला, तसेच माध्यमिक विद्यामंदिर जयगड व जयगड जेटी येथील परिसर स्वच्छ करण्यात आला.
दुपार सत्रात प्रसिद्ध मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले. यामध्ये तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे ( कृषी क्षेत्रातील व्यवसाय संधी ), मंडल कृषी अधिकारी विकास मेढे ( सेंद्रिय शेती ), समुदाय आरोग्य अधिकारी धनश्री पावरी ( आरोग्यम् धनसंपदा ), अरुण मौर्य ( कृषी समाज व साहित्य चा त्रिवेणी संगम ), विष्णू सागवेकर ( रांगोळी ), सुशील चव्हाण ( इतिहासकार ), नंदकिशोर रसाळ (माझे विद्यार्थी पथनाट्य ) आणि वक्त्यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच शिबिरार्थींनी उपस्थित विद्यार्थ्यांसमोर मतदान, जनजागृती, व्यसनमुक्ती, राजकारण या विषयावर पथनाट्य व विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
सदर शिबिराला महाविद्यालयातील प्रा. जितेंद्र बोंबले, प्रा . वर्षासनगरे, प्रा .हरेश गावडे, प्रा.केतकी धुमक, प्रा . मैथिली भरणकर यांनी भेट देऊन शिबिरार्थींना मार्गदर्शन केले. सदर शिबिराचा सांगता समारंभ दि. 23 रोजी दुपारी 2:30 वाजता झाला. प्राचार्या स्नेहा पालये, माध्यमिक विद्यामंदिर चे कर्मचारी सुभाष महाकाल, प्रा.हरेश गावडे, माजी विद्यार्थी नंदकिशोर रसाळ तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभाग कार्यक्रमाधिकारी सुयोग मोहिरे, सहाय्यक प्रा. तेजस्वी रेवाळे व स्वयंसेवक यांच्या उपस्थित संपन्न झाला.
या समारोपाच्या कार्यक्रमात उत्कृष्ट स्वयंसेवक यश साळवी, उत्कृष्ट स्वयंसेवीकाम अस्मिता पाष्टे, उत्कृष्ट बातमी सार्थक गोणबरे, उत्कृष्ट श्रमदाता कुणाल शिंदे, उत्कृष्ट श्रमदात्री श्रुती सुवरे, उत्कृष्ट नेतृत्व समर शिंदे, अष्टपैलू व्यक्तिमत्व समर शिंदे, उत्कृष्ट गट बांधिलकी या सर्व विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.
सदर शिबिर संस्थेचे कार्याध्यक्ष रोहित मयेकर, खजिनदार सुरेंद्र माचिविले, महाविद्यालयाच्या प्राचार्या स्नेहा पालये यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. त्यासाठी कार्यक्रम अधिकारी प्रा.सुयोग मोहिरे व सहाय्यक कार्यक्रम अधिकारी तेजश्री रेवाळे यांनी शिबिराचे नियोजन केले. विद्यार्थी प्रतिनिधी समर शिंदे व तन्वी तोरसे यांचे विशेष सहकार्य लाभले.

