(जाकादेवी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक ओरी केंद्र शाळेत भारतीय संविधान दिनानिमित्त परिसरात प्रभात फेरी काढून भारतीय संविधानाचे महत्त्व पटवून दिले. विशेष म्हणजे संविधान विषयावरील चित्रकला स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
प्रभातफेरीत संविधान, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच क्रांतीकारकांचा जयघोष करण्यात आला. यादिनी शालेय स्तरावर संविधान दिनानिमित्त चित्रकला स्पर्धा चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक धनंजय आंबवकर, पदवीधर शिक्षिका सौ. समिक्षा पवार, सहाय्यक शिक्षक गणपती पडूळे, रामदास चव्हाण यांनी संविधान दिनाचे महत्त्व पटवून दिले. यावेळी विद्यार्थी- पालक उपस्थित होते. संविधान दिनाचे औचित्य साधून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला शाळेच्या वतीने मुख्याध्यापक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

