(जाकादेवी / हरेश गावडे)
रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळ्याला लागूनच देऊड हे गाव वसलेले आहे. या गावांमध्ये देऊड डूगी वाडी येथे प्रतिवर्षीप्रमाणे माघी गणपती उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करते. गेली दोन वर्ष चित्रकला स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न होते. या स्पर्धेमध्ये आजूबाजूच्या परिसरातील विविध स्पर्धक आपली कला सादर करीत असतात, अशा विविध नवीन स्पर्धकांना सुवर्ण संधी देऊन त्यांच्या कलात्मक गुणांना, जगासमोर आणणे हाच या मागचा हेतू असतो.
गावातील मुले ही अतिशय मेहनती असून त्यांच्यामध्ये नावीन्यपूर्ण कला गुण भरलेले असतात. त्यांना योग्य दिशा मिळावी हाच उद्देश आयोजक घेऊन ही स्पर्धा मोठ्या उत्साहात साजरी करत असतात.
या स्पर्धेचे आयोजन अविनाश घाणेकर आणि त्यांची संपूर्ण टीम करते. मुंबई सारख्या मोठ्या रंगमंचावर त्यांनी स्वतःचे नाव कोरले आहेत. आपल्या लहान भावंडांना ही संधी मिळावी आणि त्यांनी ही यशाची उत्तुंग भरारी घेऊन एक यशस्वी पाऊल टाकावं हाच त्या मागचा हेतू आहे. गावच्या रंगमंचावर असं महत्वपूर्ण कार्य करताना अविनाश घाणेकर यांचे विचार आणि त्यांचे असणारे आपल्या गावावर प्रेम यातून प्रकट होताना दिसते.