(रत्नागिरी / राजन लाड)
भारत सरकार गृहमंत्रालय यांच्या निर्देशानुसार, नागरी संरक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशाने आणि उपनियंत्रक, नागरी संरक्षण दल, रत्नागिरी यांच्या माध्यमातून आयोजित “क्षमता बांधणी आणि विकास प्रशिक्षण शिबिराचा” समारोप बुधवारी बसणी येथे उत्साहपूर्ण वातावरणात झाला.
हे प्रशिक्षण शिबिर दि. 18 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर या कालावधीत बसणी ग्रंथालय सभागृह या ठिकाणी पार पडला. संपूर्ण शिबिराचे आयोजन जिल्हा उपनियंत्रक अधिकारी ले. कर्नल प्रशांत चतुर (से.नि.) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
या शिबिरात बसणी, काळबादेवी, रत्नागिरी शहर, आणि इतर परिसरातील अनेक स्वयंसेवकांनी उत्साहाने सहभाग घेतला. प्रशिक्षणादरम्यान नागरी संरक्षण दलाची मूलभूत तत्त्वे, आपत्ती व्यवस्थापन, आग नियंत्रण,पुर, भूकंप, सी.पी.आर., जैविक–रासायनिक–परमाणू सुरक्षा, प्रथमोपचार, स्वबचाव कार्य आणि आपत्कालीन प्रसंगी नागरिकांचे संरक्षण या विषयांवर सैद्धांतिक तसेच प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले.
प्रशिक्षणाचे मार्गदर्शन सहाय्यक उपनियंत्रक अधिकारी श्री. आनंद शिंदे आणि मास्टर ट्रेनर श्री.अक्षय जाधव यांनी केले. दोन्ही प्रशिक्षकांनी स्वयंसेवकांना 7 दिवशीय प्रात्येक्षिकाणसह सराव वास्तव परिस्थितीत तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि शिस्तीचे प्रशिक्षण देण्यात आले.
समारोप समारंभात प्रशिक्षणार्थींनी आपले अनुभव कथन करत नागरी संरक्षण दलाच्या कार्याची महत्त्वपूर्ण जाण आणि आपत्तीच्या वेळी तत्परतेने सेवा देण्याची तयारी व्यक्त केली.
या समारोप कार्यक्रमाच्या व्यासपीठावर पोलीस उपाधीक्षक श्री विकास भोसले(नि ) जैतापूर एज्युकेशन सोसायटी मुंबई चे सीईओ श्री जगदीश आडविलकर हे मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या प्रशिक्षणामुळे स्थानिक युवक आणि स्वयंसेवकांमध्ये आपत्कालीन परिस्थितीत कार्यक्षमतेने आणि शिस्तबद्ध पद्धतीने काम करण्याची मानसिक व शारीरिक तयारी निर्माण झाल्याचे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन या बॅच चे लीडर कुमारी पूजा मांडवकर यांनी केले
आपत्ती व्यवस्थापन ही फक्त जबाबदारी नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची सजगता आणि सामाजिक बांधिलकी आहे, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले

