(मुंबई)
भाजप नेत्या व मंत्री पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी पालवे-गर्जे यांनी वरळीतील राहत्या घरी गळफास घेतल्याची धक्कादायक घटना शनिवारी उघड झाली. केईएम रुग्णालयातील कार्यरत डेंटिस्ट असलेल्या गौरींच्या मृत्यूने सर्वत्र खळबळ उडाली असून, त्यांच्या कुटुंबीयांनी ही आत्महत्या नसून खूनाची शक्यता व्यक्त केली आहे.
गौरींचे वडील अशोक पावले यांनी अनंत गर्जे, त्यांची बहीण शितल गर्जे-आंधळे आणि भाऊ अजय गर्जे या तिघांविरोधात वरळी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. एफआयआरमध्ये गौरीला विवाहानंतर सतत शारीरिक व मानसिक छळाला सामोरे जावे लागत होते, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
10 महिन्यांपूर्वी थाटात झाले होते लग्न
फेब्रुवारी 2024 मध्ये गौरी व अनंत यांचे विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडले. पंकजा मुंडेसह अनेक राजकीय नेत्यांनी या विवाहात हजेरी लावली होती. मात्र लग्नानंतर काही महिन्यांतच गौरीच्या आयुष्यात वाद, संशय आणि हिंसाचाराने जागा घेतल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
काय मिळाले पुरावे? – एफआयआरमधील गंभीर उल्लेख
- अनंतचे एका महिलेसोबतचे जवळचे संबंध कुटुंबीयांना माहिती होते, असे एफआयआरमध्ये नमूद.
- अनंतच्या भावाने हे गौरीला सांगितल्याचेही उल्लेख.
- वादानंतर वरळीतील नवीन घरात संबंधित कागदपत्रे आणि चॅट्स मिळाल्याने गौरी हादरली.
- यानंतर पती-पत्नीमधील वाद वाढू लागले.
- गौरीच्या शरीरावर पूर्वी झालेल्या मारहाणीचे जखमा नातेवाईकांनी पाहिल्याचे आरोप.
कुटुंबियांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, “गौरी आत्महत्या करूच शकत नाही. हे मानसिक छळ आणि खूनाचे प्रकरण आहे.”
गौरींच्या मामाचा आरोप : “धमक्या आणि बाहेरचे संबंध”
गौरीला पतीच्या मोबाईलमध्ये काही चॅट्स मिळाल्यानंतर तिच्या मनावर मोठा आघात झाला. तिने हे घरच्यांना सांगितले, परंतु नातेवाईकही परिस्थिती समजून काय करावे हे ठरवू शकले नाही.
मामाने केलेले आरोप –
- अनंतचे बाहेरचे संबंध कधीच थांबले नाहीत.
- अनंतने स्वतःवर वार करून “मी मरेन आणि तुला अडकवेन” अशी धमकी दिली.
- गौरी खंबीर होती, ती आत्महत्या करणे शक्य नाही.
- कुटुंबीयांचा थेट आरोप : मानसिक छळामुळे मृत्यू
- गौरी गळफास घेतलेल्या अवस्थेत घरात सापडल्या.
कुटुंबीयांचा ठाम दावा, हे आत्महत्येचे प्रकरण नाही. सततच्या मानसिक आणि शारीरिक छळामुळे तिचा मृत्यू झाला आहे. तर गौरींचे वडील माध्यमांसमोर भावुक होत म्हणाले, माझं लेकरू गेलं… तीला काय सहन करावं लागलं हे आम्हाला कळलंही नाही.

