(नाशिक / प्रतिनिधी)
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे उपव्यवस्थापक गुरुपुत्र श्री नितीनभाऊ मोरे विश्वशांती महोत्सवासाठी नुकतेच अमेरिकेला रवाना झाले. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत ७ ते १८ नोव्हेंबर दरम्यान अमेरिका, कॅनडा आणि इंग्लंडमध्ये विश्वशांती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
विश्वशांती महोत्सवा बरोबरच आंतरराष्ट्रीय सत्संग मेळावे, दर्शन सोहळा, पालखी सोहळा, पादुका पूजन, प्रश्नोत्तरे सेवा, वास्तु मार्गदर्शन, मातृ-पितृ पाद्यपूजन, सरस्वती पूजन, बालसंस्कार विभागातर्फे नाटिका, श्री चक्रराज श्रीयंत्र पूजन, भारतीय संस्कृतीचे प्रदर्शन, महाआरती, महाप्रसाद असे विविध उपक्रम आणि सेवांचेही आयोजन करण्यात आले आहे.
गुरुपुत्र नितीनभाऊ मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत अमेरिकेत ७ नोव्हेंबर रोजी सिएटल शहरात, ८ नोव्हेंबर रोजी लॉस एंजलिसमध्ये, ९ नोव्हेंबर रोजी बे एरिया सिटीत ,१४ नोव्हेंबरला फिनिक्स शहरात आणि १५ नोव्हेंबरला अटलांटा शहरात कार्यक्रम होत आहेत. तर कॅनडामधील टोरंटो ब्रामटनमध्ये १६ नोव्हेंबर रोजी आणि १८ नोव्हेंबरला इंग्लंडमधील न्यू कॅसल शहरात विश्वशांती महोत्सव होत आहे.
न्यू कॅसलमधील एफएम स्टुडिओत होणार मुलाखत
न्यू कॅसलमधील एफएम स्टुडिओत गुरुपुत्र श्री नितीनभाऊ मोरे यांची सेवामार्गाची कार्यप्रणाली आणि अध्यात्म या विषयावर मुलाखत घेण्यात येणार आहे. त्यानंतर लगेचच ही मुलाखत प्रसारित केली जाईल. श्री मोरे यांच्या तीन देशात होणाऱ्या दौऱ्यामुळे स्थानिक सेवेकऱ्यांमध्ये आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. तीन देशांमध्ये होणारे विविध कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक सेवेकऱ्यांसह देश-विदेश अभियानाचे प्रतिनिधी मेहनत घेत आहेत.

