(देवरुख / सुरेश सप्रे)
येथील सह्याद्रीनगर येथे राहणारे श्री. अशोक विष्णू लिमये यांचे सोमवारी रात्री निधन झाले. मृत्युसमयी ते ७६ वर्षांचे होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) जेष्ठ नेते व माजी जिप अध्यक्ष राजाभाऊ लिमये यांचे बंधू होते.
कै. अशोक लिमये हे स्टेट बॅकतून सेवानिवृत्त झाले होते. बँकेचे ग्राहकांना सर्व सेवा मिळावी म्हणून शेतकरी, व्यापारी यांना मदतीचा हात देत. त्यांना वेळोवेळी ते मार्गदर्शन करत असत. याशिवाय देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाचे ते सदस्य होते. लोकमान्य टिळक वाचनालय देवरूख, ब्राह्मण सेवा संघ, वेदपाठक शाळा यासह विविध संस्थामध्ये ते कार्यरत होते.
सोमवारी सकाळी सह्याद्रीनगर येथील घरी जिन्यावरून ते पडले होते. त्यात त्यांचे डोक्याला जबर मार लागला होता. त्यांना त्वरीत रत्नागिरी येथे चिरायू रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचेवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. पण उपचार दरम्यान रात्री 8.50 वा.दरम्यान त्यांचे दुःखद निधन झाले.
त्यांचे पश्चात राजाभाऊ अण्णा, नरेश हे भाऊ व पत्नी, अमेय व अक्षय हे दोन मुलगे, सुना, नातवंड असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने रत्नागिरी व देवरूख येथे शोककळा पसरली आहे. त्यांचेवर सह्याद्रीनगर येथील स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी माजी मंत्री रवींद्र माने, माजी जिप अध्यक्ष रोहन बने, सदानंद भागवत, मदन मोडक, संजय भागवत तसेच विविध राजकीय पक्षांचे नेते व संस्था यांचे पदाधिकारी उपस्थित होते.

