(रत्नागिरी)
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या संघटित, पारदर्शक आणि संघर्षशील कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून लांजा तालुक्यातील अनेक शिक्षकांनी संघात भव्य प्रवेश केला. या प्रवेशामुळे संघटनेत नवचैतन्य आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या भव्य प्रवेश सोहळ्यास महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे शिक्षकांचे पंचप्राण व राज्य नेते श्री संभाजीराव थोरात, राज्य कार्यकारी अध्यक्ष श्री विलास चौगुले यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच जिल्हा नेते श्री कैलास शार्दूल, जिल्हा अध्यक्ष श्री अजय गराटे, उपाध्यक्ष श्री सुरेंद्र रणसे, मान विकास नलावडे, उर्दू सेल सल्लागार शौकत कारविणकर, जिया खान, श्री कुरवले, दिव्यांग कर्मचारी संघटना जिल्हा अध्यक्ष श्री विलास गोरे, कार्यकारी अध्यक्ष श्री दिलीप तारवे, प्राथमिक शिक्षक पतपेढी संचालक श्री चंद्रकांत झगडे, कार्याध्यक्ष श्री मंगेश कडवईकर, कोषाध्यक्ष श्री सत्यजित पाटील, कार्याध्यक्ष अंगद आबूज, सचिव श्री संतोष रावणंग, सौ आंबवकर मॅडम, मान्यवर उपस्थित होते.
या प्रवेशामध्ये लांजा तालुक्यातील शिक्षकांचे नेतृत्व करणारे श्री प्रजाप माने, श्री उमेश केसरकर, श्री प्रभाकर तांबे, श्री दिलीप चव्हाण, श्री विजय कदम, श्री लिंगण्णा भुसनूर, श्री अजय मांडवकर, श्री संदीप निखारगे,श्री नंदकुमार यादव आणि त्यांच्या बेचाळीस समर्थकांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा स्वीकार करून संघाच्या ताकदीत भर घातली.
कार्यक्रमात नव्याने प्रवेश घेतलेल्या शिक्षकांचे स्वागत शाल, श्रीफळ आणि फुलांचा गुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी राज्य नेते मा. संभाजीराव थोरात यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ हा शिक्षकांचा महासागर आहे. येथे प्रत्येकाला न्याय, कर्तृत्व आणि संधी मिळते. शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याची खरी ताकद या संघातच आहे.”
कार्यक्रमास विविध तालुक्यांचे पदाधिकारी उपस्थित होते,
लांजा तालुका अध्यक्ष मंगेश मोरे, राजापूर अध्यक्ष संदीप परटवलकर, रत्नागिरी अध्यक्ष मनोजकुमार खानविलकर, संगमेश्वर अध्यक्ष रवींद्र दरडी, गुहागर अध्यक्ष रवींद्र कुळये, चिपळूण सचिव सुनील चव्हाण, खेड अध्यक्ष श्री तांदळे, दापोली अध्यक्ष संदीप जालगावकर, मंडणगड अध्यक्ष निलेश देवकर तसेच सर्व तालुका सचिव, कार्याध्यक्ष आणि कोषाध्यक्ष उपस्थित होते.
या भव्य प्रवेशामुळे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ अधिक बळकट झाला असून शिक्षकहिताच्या लढ्याला नवा जोम, नवी दिशा आणि प्रेरणादायी उर्जा प्राप्त झाली आहे. या सभेसाठी मोठ्या संख्येने नवनियुक्त शिक्षण सेवक उपस्थित होते त्यांनी माननीय श्री संभाजीराव थोरात यांना मानधन वाढीबाबत निवेदन दिले.

