(खेड)
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे आंबवली विभागातील नेते भारत घुटुकडे यांचा नुकताच खेड तालुका शिक्षक समितीतर्फे भव्य असा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी खेड तालुक्यातून चिपळूण तालुक्यामध्ये बदली झाल्यामुळे भारत घुटुकडे यांचा खेड तालुका शिक्षक समितीतर्फे तालुका स्कूल खेड येथे आयोजित करण्यात आला होता
या निरोप समारंभ कार्यक्रमाला तालुकाध्यक्ष संतोष चव्हाण, सचिव धर्मपाल तांबे, पतपेढी संचालक सुनील दळवी, पतपेढीचे माजी चेअरमन सुनील सावंत, तालुका नेते शरद भोसले, उपाध्यक्ष बबन साळवी, नरेश ठोंबरे, तुकाराम काताळे, निलेश कांदेकर, कार्याध्यक्ष अनिल यादव, जिल्हा प्रतिनिधी श्रीकृष्ण खांडेकर, कोषाध्यक्ष नवनीत घडशी, कार्यालयीन चिटणीस सुनील पांगुळ, प्रवक्ते शैलेश पराडकर, दिलीप यादव, मुख्य संघटक नितीन साळुंखे, सल्लागार अजित भोसले, नेत्रदीप तांबे, संजय गडाळे, सहसचिव दिनेश पवार, ऑडिटर बबन मोरे, तालुका मास्तर येडू केकान, प्रसिद्धीप्रमुख नारायण शिरकर, पांडुरंग देवकते, विभाग प्रमुख शशिकांत भुवड, राजाराम दरेकर, भरत बोडके, भागोजी कडव, दीपक कांबळे, मधुकर सानप, विजय कासार, अनिल आंजर्लेकर आदी मान्यवर उपस्थित होते

