(खेड)
खेड तालुक्यातील आंबडस कदमवाडी येथील नवतरुण उत्साही मित्र मंडळ आयोजित भव्य अंडरआर्म बॉक्स सर्कल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन रोहिदास समाजसेवा संघ सातगाव विभागाचे अध्यक्ष संतोष सावर्डेकर यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.
स्पर्धेच्या उद्घाटनपूर्वी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच दीप प्रज्वलन आंबडसचे तंटामुक्ती अध्यक्ष, रोहिदास समाज सेवा संघ सातगाव विभागाचे उपाध्यक्ष ह. भ. प. शंकर कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संतोष सावर्डेकर यांनी आपल्या मनोगतात मोबाईलच्या युगात आंबडस येथील नवतरुण मित्र मंडळाने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करून तरुणांमध्ये खेळांची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. याबद्दल कौतुक करताना मंडळाने विद्यार्थी व तरुणांसाठी करियर मार्गदर्शन शिबिर आयोजित करावे असे आवाहन केले.
या स्पर्धेतील विजेत्यास १० हजार रुपये व उपविजेत्यास ७ हजार रुपये तृतीय क्रमांकास ३ हजार रुपये व आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज खेळाडूंना देखील आकर्षक चषक देऊन गौरवण्यात येणार आहे.
स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी चंद्रकांत कदम, रोहिदास समाज सेवा संघ सातगाव विभागाचे खजिनदार गणेश कदम, राकेश कदम, संतोष कदम, दत्तात्रय मोरे, अविनाश कदम, महेश कदम, किसन कदम, गणेश कदम, ओमकार मोरे, अभिजीत कदम, तन्मय कदम, मंगेश कदम, अनिकेत कदम, अमित कदम आदी उपस्थित होते.