(तरवळ / अमित जाधव)
रत्नागिरी तालुक्यातील मोहिनी मुरारी शिक्षण संस्था मालगुंड च्या मोहिनी मुरारी मयेकर कला व वाणिज्य महाविद्यालय चाफे या महाविद्यालयातील समर शिंदे या विद्यार्थ्याची गुजरात येथे होणाऱ्या नॅशनल रिपब्लिक डे परेड साठी निवड झाली आहे.
चाफे महाविद्यालयाच्या एन.एस.एस विभागाची यशस्वी कामगिरी या निमित्ताने पाहायला मिळाली. ‘राष्ट्रीय सेवा योजना’ विभागातून दरवर्षी विद्यार्थी परेड कॅम्पसाठी जातात, एन. एस. एस कॅम्प आणि विविध उपक्रमशील कार्यक्रमातून ,जो विद्यार्थी यशस्वीरित्या कामगिरी करतो, त्याची निवड कॅम्पसाठी महाविद्यालयातून केली जाते. समर शिंदे हा (T .Y. B.COM) या वर्गात शिक्षण घेत असून, त्याने स्वतःच्या मेहनतीवर बाजी मारत तो यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी सज्ज झाला आहे.
त्याची निवड सुरुवातीला राजापूर येथे झालेल्या जिल्हास्तरीय परेड चाचणी मधून मुंबई विद्यापीठाच्या परेडसाठी निवड झाली. त्यानंतर त्याने मुंबई येथे मुंबई विद्यापीठाच्या परेड मध्ये उत्तम कामगिरी ची झलक दाखवत त्याने मुंबई विद्यापीठाच्या संघात स्थान मिळविले आणि पुढे नागपूरला होणाऱ्या नागपूर विद्यापीठात परेडसाठी त्याची निवड झाली. तेथे सुद्धा त्याने आपल्या उज्वल कामगिरी मध्ये सातत्य दाखविले. त्यानंतर नागपूर विद्यापीठाच्या परेड मधूनही त्याची निवड करण्यात आली आहे. आणि आता गुजरात येथे होणाऱ्या नॅशनल रिपब्लिक डे परेडसाठी त्याची निवड झाली आहे.
समर शिंदे याने चाफे सारख्या ग्रामीण भागातील महाविद्यालयातून देशपातळीवर जे उज्ज्वल यश मिळविले आहे ते वाखाणण्यासारखे आहे. तसेच ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थ्यांसाठी आदर्शवत आहे.समर शिंदे याने जे यश मिळविले आहे त्याबद्दल त्याचे संस्थेचे कार्याध्यक्ष व सचिव रोहित मयेकर, संचालक सुरेंद्र माचीवाले यांनी अभिनंदन केले आहे.व गुजरात येथे होणाऱ्या नॅशनल रिपब्लिक डे परेड साठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच समर शिंदे याला मार्गदर्शन करणारे चाफे महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या. स्नेहा पालये आणि एन.एस.एस विभाग प्रमुख प्रा. सुयोग मोहिरे ,आणि महाविद्यालयाच्या सर्व प्राध्यापक आणि शिक्षक यांच्या कडून समर शिंदे याचे अभिनंदन केले, व पुढील होणाऱ्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. समर शिंदे याने केलेल्या उत्तम कामगिरी बद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

