(तरवळ / अमित जाधव)
गुहागर तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या डॉ नानासाहेब मयेकर माध्यमिक विद्यालय काजुर्ली येथे शारदा उत्सव ३० सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या वेळी विद्यार्थ्यांनी विविध कला सादर करून उत्सवाचा आनंद द्विगुणित केला.
शारदादेवीच्या आगमनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. शारदादेवीच्या प्रतिमेचे पूजन सिद्धार्थ गुरव यांच्या हस्ते झाले. उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी सादर केलेले विविध कार्यक्रम.यामध्ये भजन,टिपरी नृत्य,जाकडी नृत्य,गरबा इत्यादींचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलांनी उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.
यावेळी मालगुंड एज्युकेशन सोसायटी मालगुंडचे संचालक रोहित मयेकर, मुख्याध्यापक आशिष घाग, शिक्षिका परवीन तडवी, वर्षा पवार, पल्लवी महाडिक, वैष्णवी पावरी, पोलीस पाटील सीमा लिंगायत, प्रकाश गुरव, मंदार साळवी, पालक, ग्रामस्थ व सर्व आजी माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते
या उत्सवामुळे शाळेत आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

