(कळझोंडी / किशोर पवार)
रत्नागिरी तालुका डॉ. बाबासाहेब आंबेडकर (ऐक्यवादी ) संयुक्त जयंती उत्सव समितीचे विद्यमाने ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन रत्नागिरी थिबा राजा कालीन बुद्ध विहार या ऐतिहासिक भूमीवर मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
सालाबादप्रमाणे यंदाही भारतीय बौद्ध महासभा तालुका रत्नागिरी (आद.मिराताई आंबेडकर गट), बौद्धजन पंचायत समिती रत्नागिरी तालुका, आणि बौद्ध महासभा तालुका रत्नागिरी (आद.मोकळे प्रणित) या संस्थांच्या संयुक्त जयंती उत्सव समितीचे वतीने साजरा करण्यात आला.
प्रारंभी भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्ती समोर मान्यवरांहस्ते पुष्प फुले अर्पण करण्यात आली. धार्मिक पूजा पाठ घेण्यात आला. याप्रसगी आयु.प्रकाश पवार, विजय मोहिते.एम.बी.कांबळे, भगवान जाधव, मंगेश सावंत, वकिल शिवराज जाधव, सुहास कांबळे, मिलिंद कांबळे भीम युवा पँथरचे अध्यक्ष प्रितम आयरे, रत्नदीप कांबळे, महिला मंडळाच्या अध्यक्षा ऋतुजा आंबुलकर, तुषार जाधव, अनंत पवार, मंगेश जाधव, सचिन जाधव, प्रमोद पवार, अजय कांबळे, किशोर कांबळे, संजय आयरे, सौरभ आयरे, विलास कांबळे, सेवानिवृत्त अधिकारी जी कर्मचारी महासंघाचे भास्करराव कुरतडकर, आयु. साळवी, आयु. कांबळे, आयु. जाधव यांचेसह तालुक्यातील बहुसंख्य धम्म बंधू भगिनी उपस्थित होत्या.
उपस्थित सर्व बंधू भगिनी युवक यांचे संयुक्त जयंती उत्सव समितीचे वतीने आभार मानण्यात आले.

