( देवरुख / प्रतिनिधी )
देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांच्या संघाने १९ वर्षाखालील गटाचे संगमेश्वर तालुका शालेय हॉलीबॉल स्पर्धेचे विजेतेपद प्राप्त केले आहे. आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाचा संघ जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये संगमेश्वर तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. सलग दोन वर्ष कनिष्ठ महाविद्यालय संघ जिल्हास्तरीय शालेय हॉलीबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. कनिष्ठ महाविद्यालयाच्या संघाने आश्रम शाळा,निवे संघावर मात करून अंतिम विजेतेपद प्राप्त केले.
कनिष्ठ महाविद्यालयाच्या संघाला क्रीडा प्रशिक्षक संजय इंदुलकर व क्रीडा शिक्षक सागर पवार यांचे मार्गदर्शन लाभत आहे. या हॉलीबॉल संघात पियुष गोताड, ऋषिकेश बागम, वेद लिंगायत, पियुष वेले, आर्यन पेंढारी, साईराज आंब्रे, दुर्वेश चिमाणे, सुहेल हरचिरकर, सिद्धेश लिंगायत, नयन लिंगायत, सार्थक आडसे, सौरभ झेपले या विद्यार्थी खेळाडूंचा समावेश आहे.
विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशासाठी आणि पुढील स्पर्धेकरिता संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, सुजाता प्रभुदेसाई, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे, जिमखाना प्रमुख प्रा. धनंजय दळवी, प्रा. प्रवीण जोशी, प्रा. अभिनय पातेरे, प्रा. स्वप्नाली झेपले, प्रा. वसंत तावडे आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

