(संगमेश्वर)
संगमेश्वर तालुक्यातील कळंबस्ते तेले वाडी परिसरात एका घराच्या लाकडी कोठारात लपलेल्या जातीवंत नाग सापाला सर्पमित्र उमेश पागार यांनी सुरक्षितरित्या पकडून त्याला जीवदान दिले.
बुधवारी दुपारी समीर पाटील यांच्या लाकडी कोठारात एक मोठा नाग साप आढळून आला. घाबरून न जाता स्थानिक रहिवासी सुरेश तेली यांनी तात्काळ देवरुख येथील प्रसिद्ध सर्पमित्र उमेश पागार यांच्याशी संपर्क साधला. उमेश पागार यांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेत सापाला सावधपणे बाटलीत पकडून सुरक्षितपणे जेरबंद केले. नंतर त्यांनी हा साप वनविभागाच्या देवरुख कार्यालयाच्या ताब्यात सुपूर्द केला. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्या सापाची पाहणी करून त्याला सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडले.
या मदतीमुळे सापाला जीवदान मिळाले आणि परिसरात नागरिकांमध्येही दिलासा निर्माण झाला. सर्पमित्र उमेश पागार यांची ही तत्परता व धाडस स्थानिकांनी कौतुकाने गौरवले असून, निसर्गसंतुलनाच्या दृष्टीनेही ही कृती अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली आहे.