(देवरूख / प्रतिनिधी)
रत्नागिरी शहरातील झाडगाव येतील कोहिनूर नंदन मधील रहिवासी व स्वामी स्वरुपानंद परमभक्त शकुंतला प्रल्हाद पंडित यांचे बुधवार दि. २४ सप्टेंबर रोजी आकस्मिक निधन झाले. मृत्यूसमयी त्या ८५ वर्षांच्या होत्या. शकुंतला पंडित या धार्मिक, परोपकारी वृत्तीच्या होत्या. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.
पावस येथील श्री स्वामी स्वरूपानंद यांच्या त्या निस्सीम भक्त होत्या. स्वरूपानंद सेवा मंडळात पंडित आजी म्हणून त्या परिचित होत्या. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच पावस येथील स्वामींच्या समाधीवरील तुळशीचा हार व शाल एका भक्तामार्फत पाठविण्यात आली. ती कलेवर समर्पित करण्यात आली.
स्वामी म्हणे झाले कृतार्थ जीवन सद्गुरु चरण उपासीता या स्वामी स्वरूपानंद यांनी दिलेल्या संदेशानुसार १९६८ पासून भक्ती करत वेळोवेळी त्यांचे दर्शन घेत आपले जीवन सर्वस्वी स्वामींना वाहून त्यांनी आजपर्यंतची वाटचाल केली. स्वामी स्वरूपानंद यांचे प्रत्यक्ष दर्शन आणि त्यानंतर अनुग्रह घेतलेल्या अशा सामान्य कुटुंबातील एक व्यक्ती होत्या.
वेळोवेळी भगवंताचे नामस्मरण आणि स्वामींची भक्ती हेच त्यांचे जीवनाचे ध्येय होते. स्वामींच्या समाधी प्रयोजनानंतर झालेल्या पहिल्या जन्मोत्सवात म्हणजेच १९७४ डिसेंबर उत्सवामध्ये त्यांनी त्यांच्यावरील काव्यही स्वामींना अर्पण केले होत.
कै शकुंतला पंडित यांच्या अंत्ययात्रेला समाजातील विविध स्तरातील मंडळी उपस्थित होती. शहरातील प्रसिद्ध आकृती डिझाईनचे श्रीकृष्ण उर्फ मायकल पंडित यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात मुलगा संतोष, लता व सरीता या २ मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

