(संगमेश्वर / मकरंद सुर्वे)
आपण समाजासाठी आपल्या परीने हातभार लागावा म्हणून, तसेच समाजासाठी पारदर्शक पद्धतीने लोकोपयोगी कार्य करण्याच्या उद्देशाने सौ. नुपुरा उन्मेष मुळ्ये यांनी अंतरा फाउंडेशन रत्नागिरी या सेवाभावी संस्थेची स्थापना आंबेड बुद्रुक येथे केली आहे. यामध्ये वेळोवेळी महिला सक्षमिकारणासाठी त्यांना व्यवसाय कौशल्य मार्गदर्शन करणे, त्यांना शासकीय योजनांची माहिती देऊन त्यांना त्या मिळण्यासाठी प्रयत्न करणे, शाळेतील मुलांना त्यांना आवश्यक अशी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे असे विविध उपक्रम राबविले जाणार आहेत.
भारतीय जनता पार्टी रत्नागिरी दक्षिणच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ. वर्षा परशुराम ढेकणे यांनी त्यांच्या या कामाचे कौतुक करत या संस्थेचे उदघाटन केले आणि पुढील वाटचालीसाठी संस्थेच्या अध्यक्षा सौ. नुपुरा मुळ्ये यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी कार्यक्रमासाठी भाजपा मध्य मंडळ अध्यक्षा सौ. प्रियल जोशी, महिला जिल्हा उपाध्यक्षा सौ. अनुश्री आपटे, सचिव सौ. सरिता आंबेकर, सौ. भक्ती दळी, सौ. अनुष्का शेलार, सौ. प्रज्ञा टाकळे आदी महिला पदाधिकारी तसेच रत्नागिरी शहर अध्यक्ष श्री. दादा ढेकणे, मध्य मंडळ सरचिटणीस श्री. राजेश आंबेकर, अध्यात्मिक सेल प्रमुख श्री. प्रशांत जोशी, रा. स्व. संघ संगमेश्वर चे श्री. उन्मेष मुळ्ये, श्री. सतीश पटेल, श्री. मंगेश साळवी, आंबेड बु. तेलीवाडी प्रमुख श्री. चंद्रकांत रहाटे, श्री. गंगाधर रहाटे, श्री. संदीप रहाटे, श्री. प्रमोद रहाटे, सौ. अपर्णा शिगवण, सौ. स्मिता रहाटे, सौ. शर्मिला रहाटे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

