( रत्नागिरी )
रत्नागिरी जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील 42 विशेष शिक्षकांचे केंद्रस्तरावर समायोजन केले आहे. हा ऐतिहासिक निर्णय जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. वैदही रानडे व शिक्षणाधिकारी श्री किरण लोहार यांच्या कार्यतत्परता व सहकार्यामुळे शक्य झाला आहे.
शासन निर्णय दिनांक ०८ ऑक्टोबर २०२४ अन्वये हे समायोजन १५ जुलै २०२५ रोजी पार पडले. यासंदर्भातील आदेश व शालार्थ आयडी प्रमाणपत्रे २२ सप्टेंबर २०२५ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. वैदही रानडे यांच्या हस्ते विशेष शिक्षकांना प्रदान करण्यात आली. या वेळी शिक्षणाधिकारी श्री. किरण लोहार, शिक्षण विस्तार अधिकारी श्री. संदेश कडव तसेच सर्व 10 विशेष शिक्षक उपस्थित होते.मंडणगड – २,दापोली – ५,खेड – ५,चिपळूण – ७,गुहागर – ३,संगमेश्वर – ५,रत्नागिरी – ७,लांजा – ४,राजापूर – ४,अशा
एकूण – ४२ या निर्णयामुळे गेली १७ वर्षे शिक्षण विभागात कार्यरत असलेल्या विशेष शिक्षकांना न्याय मिळाला असून त्यांनी पालकमंत्री डॉ. सामंत यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
विशेष गरज असलेल्या विद्यार्थ्यांना अधिक सक्षम, दर्जेदार व सुयोग्य शैक्षणिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. नवरात्रोत्सावाच्या पहिल्याच दिवशी हे आदेश देण्यात मला विशेष आनंद होत आहे. वेतनही लवकरच अदा होत आहे. सदर 42 शिक्षकांनी मेहनत करून शासनाने दिलेल्या संधीचे सोने करावे, आपल्या अनुभव व कौशल्याचा वापर करून शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी योगदान द्यावे, असे शिक्षणाधिकारी ( प्राथमिक) किरण लोहार यांनी म्हटले आहे.
फोटो : मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी सौ. वैदही रानडे विशेष शिक्षकांना आदेश व शालर्थ आयडी प्रमाणपत्रे देताना. यावेळी उपस्थित शिक्षणाधिकारी किरण लोहार, शिक्षण विस्तार अधिकारी संदेश कडव

