(गावखडी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील दुर्गादेवी नवरात्रोत्सव मंडळ, साळवी नगर गोळप सडा येथे यावर्षी नवरात्रोत्सवानिमित्त भव्य आणि वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 26 सप्टेंबर रोजी रात्री साडेदहा वाजता बुवा श्री. संदीप लोके आणि बुवा श्री. गुंडू सांवत यांच्यात भजनांचा 20×20 जंगी सामना रंगणार असून त्यानंतर सलग काही दिवस धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी भाविकांना अनुभवायला मिळणार आहे.
27 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता गोंधळ-जोगवा मागणीचा कार्यक्रम, रात्री साडेसातला दिवटी नाच आणि दहा वाजता गोंधळ कथा होणार आहे. 28 सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता महिलांचे हळदीकुंकू, संध्याकाळी सहा वाजता होममिस्टर स्पर्धा, तसेच रात्री साडेनऊ वाजता दांडियारासाचे आयोजन केले आहे. 29 सप्टेंबर रोजी दुपारी साडेचारला पाककला आणि रांगोळी स्पर्धा होणार असून रात्री पुन्हा दांडियारासाची रंगत वाढवली जाणार आहे.
30 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता होमहवन आणि कुमारी पूजन, रात्री दहा वाजता पाच ते वीस वयोगटातील मुलांसाठी डान्स स्पर्धा आणि रात्री अकराला दांडियारास होणार आहे. 1 ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजता महाप्रसाद, रात्री दहा वाजता बक्षीस वितरण समारंभ आणि रात्री अकरा वाजता शाहीरांचा जंगी सामना होणार आहे. यात तुरेवाले शाहीर योगेश जाधव रायगड विरुद्ध शक्ती वाले शाहीर तेजल पवार अशी उत्साहवर्धक मैफल रंगणार आहे.
2 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता दसरा मंदिरामध्ये सोने वाटपाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर सात वाजता आरती आणि रात्री साडेनऊ वाजता दांडियारासाचे आयोजन आहे. 3 ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीन वाजता आरती-गान्हाणे, चार वाजता देवीची विसर्जन मिरवणूक आणि रात्री साडेसातला अंतिम आरतीचा कार्यक्रम होऊन उत्सवाची सांगता होणार आहे.
नवरात्रोत्सवातील या भव्य आणि विविध कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाच्या अध्यक्षा सौ. निहा आनंद साळवी यांनी केले आहे.
📸 छायाचित्र : दिनेश पेटकर, गावखडी

