(रत्नागिरी)
शहरातील प्रभाग क्र. १४ मधील विलणकरवाडी ते घुडेवठार या रस्त्याची झालेली दुर्दशा लक्षात घेऊन अमित विलनकर यांनी स्वतःच्या खर्चाने रस्त्याच्या दुरुस्तीचे काम पूर्ण केले आहे. या कामामुळे अनेक दिवसांपासून होत असलेल्या अपघातांना आळा बसणार असून, आगामी नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची गैरसोय टळणार आहे.
गेल्या अनेक दिवसापासून हा रस्ता खराब झाला होता, ज्यामुळे दुचाकीस्वारांचे अपघात होत होते आणि नागरिकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत होता. वारंवार मागणी करूनही दुरुस्तीचे काम होत नसल्याने, अमित विलनकर यांनी पुढाकार घेऊन घुडेवठारमधील देवी मंडपच्या समोरील रस्ता सिमेंट-काँक्रीटच्या मदतीने खड्डेमुक्त केला.
त्यांच्या या सामाजिक कार्याबद्दल प्रभाग आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी समाधान व्यक्त करत त्यांचे आभार मानले. कामाची सुरुवात नारळ वाढवून करण्यात आली. यावेळी विलास विलणकर, साईनाथ शेठ नागवेकर, प्रकाश घुडे, मुकुंद विलणकर, कमलाकर जोशी, घुडेवठार नवरात्री मंडळाचे अध्यक्ष सुमित नागवेकर, उपाध्यक्ष साईराज घुडे, सचिव सूरज बंटी जोशी, शशीकाका घुडे, मनीष जोशी, गौरव नागवेकर, शुभम नागवेकर, आनंद नाखरेकर, राज नागवेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
ही दुरुस्ती योग्य वेळी पूर्ण झाल्यामुळे, नवरात्र उत्सवासाठी येणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. अमित विलनकर यांच्या या उदात्त कार्याची सर्वत्र कौतुक होत आहे.

